BSNL चा 29 रुपयांचा प्लॅन; मिळेल अनलिमीटेड कॉलिंगसह 1GB डेटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bsnl plan

BSNL चा 29 रुपयांचा प्लॅन; मिळेल अनलिमीटेड कॉलिंगसह 1GB डेटा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जर तुम्ही BSNL वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी अनलिमीटेड कॉलिंग आणि भरपूर डेटा ऑफर करणारा स्वस्त रिचार्ज देत आहे ज्याची किंमत 50 रुपयांपेक्षा कमी आहे. आणि यामध्ये, तुम्हाला अनलिमीटेड कॉलिंगसह, एसएमएस आणि 1 जीबी डेटा देखील दिला जातो. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर

BSNL च्या या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत फक्त 29 रुपये आहे. होय, इतक्या कमी किमतीतही कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक फायदे देत आहे, जे इतर कोणत्याही कंपनीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये शक्य नाही. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट्ससोबत तुम्हाला 1 जीबी डेटा देखील दिला जातो.

29 रुपयांय मिळतात हे लाभ

BSNL च्या 29 रुपयांच्या रिचार्जबद्दल सांगायचे तर, डेटा आणि कॉलिंगच्या फायद्यांव्यतिरिक्त, यात आणखी एक फायदा आहे जो इतर कंपन्यांच्या अशा स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये दिला जात नाही. या रिचार्ज प्लॅनसह, ग्राहकांना 300 मोफत एसएमएस देखील दिले जातात. जरी एसएमएस खूप कमी लोक वापरतात, तरीही तुमच्या फोनमध्ये इंटरनेट चालू नसेल तर ते खूप उपयुक्त ठरू शकतात. तुम्हाला एसएमएससाठी वेगळे रिचार्ज करण्याची गरज नाही आणि इतक्या स्वस्त रिचार्जमध्येही एसएमएस सुविधा उपलब्ध आहे.

जर आपण वैधतेबद्दल बोललो तर BSNL च्या या रिचार्जचा लाभ 5 दिवसांसाठी घेता येईल. कमी वैधता असेल तरीही कंपनीकडून या प्लॅनमध्ये ग्राहकांना खूप जास्त लाभ दिले जात आहेत.

हेही वाचा: गुगलने बॅन केले 'हे' 7 Android अ‍ॅप्स; फोनमधून लगेच करा डिलीट

loading image
go to top