BSNL चे सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन्स; किंमत 199 पासून सुरू

bsnl 499 prepaid plan
bsnl 499 prepaid plan
Updated on

BSNL Postpaid Plans : सरकारी दूरसंचार कंपनी BSNL खाजगी कंपन्यांना (Reliance Jio, Airtel, Vodafone Idea) केवळ प्रीपेड प्लॅन्समध्येच नव्हे तर पोस्टपेड प्लॅन (Postpaid Plans) साठी देखील चांगली स्पर्धा देत आहे. BSNL कडे अनेक पोस्टपेड प्लॅन आहेत, ज्यात इंडिविज्युअल आणि फॅमिली कनेक्शन देण्यात येतात. कंपनीच्या पोस्टपेड प्लॅनची ​​किंमत फक्त 199 रुपयांपासून सुरू होते. चला तर मग BSNL च्या पोस्टपेड प्लॅन बद्दल जाणून घेऊया

199 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

हा BSNL चा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान आहे. या इंडिविज्युअल प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना अमर्यादित फ्री व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. प्लॅनमध्ये तुम्हाला 25 GB फ्री डेटा मिळेल. 75 GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा देखील आहे.

399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

हा यादीतील पुढील प्लॅन आहे, ज्याचे वेबसाइटवर "घर वापसी प्लॅन" असे वर्णन केले आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस आणि 70 जीबी मोफत डेटा दिला जातो. यामध्ये तुम्हाला 210 GB पर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते.

525 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

525 रुपयांच्या बीएसएनएल पोस्टपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित मोफत व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस प्रतिदिन दिले जातात. यामध्ये तुम्हाला ८५ जीबी फ्री डेटा मिळेल. 255 GB पर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा देखील आहे. या प्लॅनमध्ये एक अतिरिक्त फॅमिली सिम देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये अमर्यादित मोफत कॉलिंग दिले जाते. तथापि, इतर सिममध्ये डेटा आणि एसएमएस उपलब्ध नाहीत.

bsnl 499 prepaid plan
Vi चा 599 चा प्रीपेड प्लॅन, देतोय Jio-Airtel पेक्षा भारी बेनिफिट्स

798 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

या प्लॅनची खासियत म्हणजे यामध्ये 2 अतिरिक्त फॅमिली सिम उपलब्ध आहेत. प्राथमिक सिम सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग, 100 SMS आणि 50 GB डेटासह 150 GB पर्यंत डेटा रोलओव्हर ऑफर करते. त्याच वेळी, दुसरे फॅमिली कनेक्शनसह, फ्री कॉलिंग, 50-50 जीबी डेटा आणि 100 एसएमएस दररोज उपलब्ध आहेत.

999 रुपयांचा प्लॅन

BSNL चा 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्येएक प्रायमरी आणि 3 फॅमिली कनेक्शन दिलेले आहेत. प्राथमिक कनेक्शन मोफत कॉलिंग, 100 SMS दररोज, 75 GB डेटा आणि 225 GB पर्यंत डेटा रोलओव्हर दिला जातो. त्याच वेळी, फॅमिली कनेक्शनमध्ये, प्रत्येक सिमवर विनामूल्य कॉलिंग, 75 जीबी डेटा आणि दररोज 100 एसएमएस मिळतात.

1,525 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

या यादीतील सर्वात महागडा प्लॅन आहे. ही इंडिविज्युअल प्लॅन आहे. यामध्ये दररोज सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे यामध्ये अनलिमिटेड डेटा देखील दिला जातो.

bsnl 499 prepaid plan
Airtel चे ३ परवडणारे प्रीपेड प्लॅन; मिळते चांगली व्हॅलिडिटी अन् डेटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com