BSNL New Update : बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लॅन्स आणि वाढत्या 4G आणि 5G नेटवर्क विस्तारामुळे बीएसएनएल भारतीय नेटवर्क बाजारपेठेत चर्चेत आला आहे. पण नुकताच एक धक्कादायक दावा समोर आला आहे. सोशल मीडियावर बीएसएनएल 5G स्मार्टफोन लाँच करणार असल्याची आणि त्यामध्ये 200 मेगापिक्सल कॅमेरा असणार असल्याची चर्चा आहे. पण या अफवांवर काय विश्वास ठेवायचा? जाणून घेऊया यामागचे सत्य काय...
गेल्या काही आठवड्यांत रिलायन्स जियो, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांच्या रिचार्जच्या किंमती वाढवल्यानंतर बीएसएनएल टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये चर्चेत आला आहे. स्वस्त रिचार्ज प्लॅन आणि वाढत्या 4G व 5G नेटवर्क विस्तारामुळे बीएसएनएल भारतीय बाजारात चर्चेचा विषय बनला आहे. आता या चर्चेला आणखी वेग देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बीएसएनएल 200 मेगापिक्सल कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याची बातमी.सोशल मीडियावर या अफवांनी वेग धरला आहे.
सोशल मीडियावर अनेकदा चुकीची माहिती पसरते. यावेळीही तसंच झालं. बीएसएनएल 200 मेगापिक्सल कॅमेरा आणि 7000mAh ची बॅटरी असलेला 5G स्मार्टफोन लाँच करणार असल्याची अफवा पसरली. काही लोकांनी तर या फोनची छायाचित्रेही शेअर केली आहेत. पण यामध्ये काहीच तथ्य नाहीये.
या अफवांवर बीएसएनएलने ट्विटरवर स्वतःच खुलासा केला आहे. बीएसएनएल असा कोणताही स्मार्टफोन लाँच करण्याचा विचार करत नाही. लोकांनी अशा अफवांना बळी न पडावं असा सल्लाही बीएसएनएलने दिला आहे. फसवणूक करणाऱ्या लोकांमुळे ग्राहकांचे नुकसान होऊ नये म्हणून बीएसएनएलने ही सूचना दिली आहे.
बीएसएनएलने केलेल्या ट्वीटनुसार, कंपनीचा असा कोणताही स्मार्टफोन लाँच करण्याचा विचार नाही. तसेच अस्तित्वात नसलेल्या 5G फोनसाठी पैसे मागणाऱ्या लोकांपासून सावध रहावे असा इशाराही दिला आहे. ग्राहकांनी फक्त अधिकृत माहितीसाठीच बीएसएनएलच्या अधिकृत चॅनेलवर अवलंबून राहावे असे आवाहन केले आहे.
5G स्मार्टफोन ही अफवा असली तरी, परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅन्समुळे बीएसएनएलची लोकप्रियता वाढतच राहणार आहे. खासकरून इतर कंपन्यांच्या वाढत्या रिचार्ज दरांमुळे अनेक ग्राहक बीएसएनएलकडे वळत आहेत. जुलै महिन्यापासून बीएसएनएल ग्राहकांची संख्या वाढली आहे.
बीएसएनएल सध्या हाय-एंड स्मार्टफोन लाँच करण्यापेक्षा ग्राहकांना किफायतशीर प्लॅन आणि चांगली सेवा देण्यावर भर देत आहे. ग्राहकांनी अशा अफवांना बळी न पडता अधिकृत माहितीसाठी बीएसएनएलच्या अधिकृत मार्गावर अवलंबून राहावे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.