esakal | खुशखबर! BSNL ग्राहकांना देणार १०० मिनिटं फ्री आणि एक महिन्याची वाढीव वैधता
sakal

बोलून बातमी शोधा

खुशखबर! BSNL ग्राहकांना देणार १०० मिनिटं फ्री

खुशखबर! BSNL ग्राहकांना देणार १०० मिनिटं फ्री

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नागपूर : कोरोना (Coronavirus) तौक्ते वादळापासून (Tauktae Cyclone) प्रभावित ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून 2 महिन्यांची अतिरिक्त वैधता देण्याची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त, 100 कॉलिंग मिनिटे देखील ग्राहकांना विनामूल्य देण्यात येतील. मात्र हे फायदे केवळ अशा ग्राहकांना उपलब्ध असतील ज्यांचे प्रीपेड प्लॅन 1 एप्रिल रोजी किंवा नंतर संपतील. यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे कंपनीचे म्हणणे आहे. (BSNL will give 100 free minutes to customers)

हेही वाचा: आता तुमचा स्मार्टफोनच असणार तुमच्या कारची चावी; Google आणणार भन्नाट फिचर

बीएसएनएलच्या (BSNL Postpaid) मते, सर्व बाधित ग्राहकांच्या योजनेची वैधता 31 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय, 100 कॉलिंग मिनिटे ग्राहकांना विनामूल्य दिली जात आहेत, जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि मित्रांशी संपर्क साधतील.

बीएसएनएलने एप्रिलमध्ये 249 आणि 298 रुपयांच्या प्रीपेड योजना सुरू केल्या. कंपनीच्या पहिल्या प्रीपेड योजनेबद्दल बोलताना त्यामध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे, ही योजना एकूण 56 जीबी डेटासह येते. याशिवाय येथे अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सुविधा आहे. या योजनेची वैधता 28 दिवसांची आहे.

हेही वाचा: मधमाश्यांनाही आवडतं आईसक्रीम? त्यांचं आइसक्रीम नक्की कोणतंय? जाणून घ्या

तर दुसरीकडे 2 जीबी डेटा दररोज 298 रुपयांच्या योजनेत अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधेसह दिला जातो. याशिवाय दररोज 100 एसएमएस उपलब्ध असतात. या योजनेवर 56 दिवसांची वैधता दिली जाते. याशिवाय इरोस नाऊचे ग्राहकांनाही विनामूल्य सबस्क्रिप्शन दिले जाते.

(BSNL will give 100 free minutes to customers)

loading image