Cheapest 7 seater car: बजेट मस्त अन् किंमत स्वस्त! देशातील सगळ्यात स्वस्त 7-सीटर कार; फिचर्सही दमदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cheapest 7 seater car

Cheapest 7 seater car: बजेट मस्त अन् किंमत स्वस्त! देशातील सगळ्यात स्वस्त 7-सीटर कार; फिचर्सही दमदार

Low budget 7-Seater Car: तुमचं कुटुंब मोठं असेल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा विचार करता स्वस्तात मस्त कार घ्यायची असेल तर तुम्हाला या कारबाबत माहिती असायलाच हवं. आज आपण देशातील अशा कारबाबत जाणून घेऊया ज्यांची किंमतही कमी आहे आणि मायलेजसुद्धा दमदार आहे. त्यामुळे या कारला चालवण्यासाठी तुम्हाला खर्चही कमी येणार आहे.

मारुती सुझूकी इको (Maruti Suzuki Eeco)

मारुती सुजुकी ईको 5-सीटर आणि 7-सीटर, दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत. ही देशातील सर्वोत्तम स्वस्त आणि अधिक विकली जाणारी 7-सीटर कार आहे. त्याची किंमत ५.१० लाख रुपये (५-सीटर) पासून सुरू होते. त्याची 7-सीटर वर्जनची किंमत 5.42 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी, दोन्ही फ्यूल ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. सीएनजीवर या कारचा मायलेज 26KM पर्यंत आहे.

रेनॉल्ट ट्रायबर (Renault Triber)

रेनॉल्ट ट्रायबर ही देशातील दुसरी सर्वात स्वस्त 7 सीटर कार आहे. त्याची किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.0-लिटर नॅचरली एस्पिरेटेड, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन असते जे 72PS आणि 96NM आउटपुट देते. यात 84 लीटर बूट स्पेस मिळते. कारमध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 6-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

हेही वाचा: Low Budget Laptop: ही वेबसाइट विकतेय सगळ्यात स्वस्त लॅपटॉप! किंमत फक्त 10 हजार...

मारुती आर्टिगा (Maruti Ertiga)

लिस्टमध्ये तिसरा नंबर लागतो मारुती सुजुकी आर्टिगाचा. ही कार वरील दोन कारपेक्षा मोठी आहे. याची किंमत 8.41 लाख रुपये आहे. यातही तुम्हाला आणि सीएनजी दोन्ही फ्लूल ऑप्शन तुम्हाला मिळतात. ही कार एमपीवी सेगमेंटमध्ये येते. यात 1.5 लीटर पेट्रोल इंजिन उपलब्ध असते. ही कार 103PS आणि 137Nm आउटपुट देते. सीएनजीवर ही कार 26 किमी मायलेज देते.