esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

होंडा अॅक्टिव्हा

होंडा अॅक्टिव्हा खरेदी करा २५ हजारात, आवडली नाही तर परत करा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारतीय बाजारात मोटारसायकलप्रमाणे स्कूटरची मोठी बाजारपेठ आहे. यात सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे होंडा अॅक्टिव्हा (Honda Activa) . ती मायलेज आणि साध्या स्टाईलसाठी ओळखली जाते. जर तुम्ही अॅक्टिव्हा शोरुममधून खरेदी केली, तर तुम्हाला ती ६९ हजार ८० रुपये रुपये मोजावे लागतील. जर तुमच्याकडे एवढे बजेट नसेल तर ? तर जाणून घ्या ही होंडा अॅक्टिव्हा केवळ २५ हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याचे पूर्ण तपशील. तत्पूर्वी या स्कूटरचे मायलेज, फिचर्सविषयी जाणून घ्या...

- या स्कूटरमध्ये १०९.५ सीसीचे इंजिन आहे. ते ७.६८ बीएचपीची पाॅवर आणि ८.७९ एनएमचे पीक टाॅर्क निर्माण करते. या स्कूटरचे ट्रान्समिशन ऑटोमॅटिक आहे.

- स्कूटर एक लीटर पेट्रोलवर ६० किलोमीटरचे मायलेज देते. तिच्या ब्रेकिंग सिस्टम पाहिल्यानंतर फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हिलमध्ये कंपनीने ड्रम ब्रेकचे काॅम्बिनेशन दिले आहे. त्याबरोबर दोन्ही टायर ट्युबलेस आहेत.

- फिचर्स पाहिल्यास त्यात इंजिन स्टार्ट-स्टाॅप स्वीच, डबल एलआयडी एक्स्टर्नल फ्यूल फिल, सायलेंट स्टार्ट विथ एसीजी, इंजिन किल स्विच, फ्यूल गाॅज, लो बॅटरी इंडिकेटर आणि पास लाईटसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा: स्मार्ट माहिती : ऑटो डेबिट सुविधेत काय होणार बदल?

आता ऑफरविषयी

- वास्तविक हे ऑफर दिले आहे CARS24ने. ती एक जुनी वाहने खरेदी-विक्री करणारे संकेतस्थळ (वेबसाईट) आहे. या संकेतस्थळाच्या टु-व्हिलर सेक्शनमध्ये होंडा अॅक्टिव्हा लिस्ट करण्यात आली आहे. तिची किंमत २५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर खरेदी केल्यास कंपनी तुम्हाला एका वर्षाच्या वाॅरंटीबरोबर सात दिवसांचे मनी बॅक गॅरंटीही देत आहे. या मनी बॅक गॅरंटीनुसार जर स्कूटर खरेदीच्या सात दिवसांत तुम्हाला आवडली नाही किंवा त्यात काही बिघाड झाली तर तुम्ही ही अॅक्टिव्हा कंपनीला परत करु शकता. त्यानंतर कंपनी तुम्हाला तुमची रक्कम पूर्ण परत करेल.

loading image
go to top