Amazon Fraud : 'रेडो' कंपनीच्या घड्याळाचे फोटो दाखवून ग्राहकाची फसवणूक, ॲमेझॉनवर गुन्हा दाखल; नागपुरातील प्रकार

१,८०० रुपयांचं एक घड्याळ आता कंपनीला किती महागात पडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे..
Amazon Fraud
Amazon FraudeSakal

नागपूर : ग्राहकाला बनावट घड्याळ विकणे ॲमेझॉन कंपनीच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणात मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने कळमना पोलिस ठाण्याला ॲमेझॉन कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. परमजितसिंग कलसी यांनी कंपनी विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. दंडे यांनी निर्णय दिला. अर्जानुसार, कलसी यांनी ब्रँडेड कंपनीचे घड्याळ स्वस्त दरात विकत घेण्यासाठी इंटरनेटवर शोधा-शोध केली. त्यांना आवडलेले १ हजार ८९८ रुपयांचे घड्याळ ॲमेझॉन कंपनीच्या वेबसाइटवर त्यांना उपलब्ध दिसले. त्यावेळी स्वित्झर्लँड येथील ब्रँडेड रेडो कंपनीच्या एका घड्याळाचे सुंदर-सुंदर फोटोसुद्धा त्यांना पाहायला मिळाले. कलसी यांच्याकडे ॲमेझॉनचे वार्षिक सबस्क्रिप्शनसुद्धा असल्याने १९ डिसेंबर २०२१ रोजी ऑनलाइन पेमेंट करून त्यांनी ते घड्याळ ऑर्डर केले. दिल्ली येथील एम. के. मार्केटींगने ती ऑर्डर स्वीकारली.

Amazon Fraud
Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉनमध्ये पुन्हा कर्मचारी कपात; ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना दिला नारळ

लागलीच २३ तारखेला त्यांना हे घड्याळ प्राप्त झाले. घड्याळ घेतल्याच्या उत्साहापाई मुलांनी व्हिडिओ रेकॉर्डींगकरीत ते पॅकेट उघडले. मात्र, ब्रँडेड ऐवजी सर्वसाधारण घड्याळ मिळाल्याने कलसी कुटुंबीयांच्या उत्साहावर पाणी फिरलं. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कळमना पोलिस ठाण्यात धाव घेतली. परंतु, पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल न केल्याने कलसी यांनी ॲमेझॉन आणि विक्रेत्या विरोधात न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला.

न्यायालयाने ॲमेझॉन कंपनीवर गुन्हा दाखल करायचे आदेश दिले. तसेच, कळमना पोलिसांना तपासकरीत याचा नियमानुसार अहवाल दाखल करण्याचे आदेश देत अर्ज निकाली काढला. कलसी यांच्यातर्फे ए. एस. तिवारी यांनी बाजू मांडली. (Tech News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com