

CERT-In WhatsApp Warning: Update Apps Now
esakal
CERT-In High-Risk Warning for WhatsApp Users: भारत सरकारच्या संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाने म्हणजेच CERT-In ने अँड्रॉइड, iOS आणि मॅक डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप व व्हॉट्सॲप बिझनेस वापरणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी उच्च जोखमीचा सुरक्षा इशारा दिला आहे. या त्रुटींचा गैरफायदा घेत दूरवरून घातक कोड चालवला जाऊ शकतो, असा इशारा 26 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या CIVN-2026-0576 या वल्नरेबिलिटी नोटमध्ये देण्यात आला आहे.
वैयक्तिक तसेच संस्थात्मक पातळीवर मोबाइल व मॅक डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांनी या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहावे, असे सांगण्यात आले आहे. यशस्वी हल्ल्यात संवेदनशील माहिती मिळवणे, सुरक्षा निर्बंध टाळणे, ॲपमधील डेटाशी छेडछाड करणे किंवा मनमानी कोड चालवणे यांसारखे धोके उद्भवू शकतात.