iPhone Hacking : घरात अ‍ॅपलचे डिव्हाईस असतील तर त्वरीत करा 'हे' काम; केंद्र सरकारने दिला गंभीर इशारा

CERT-In Warning : सध्या देशात आयफोन हॅकिंग प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे.
iPhone Hacking
iPhone HackingeSakal

सध्या देशात आयफोन हॅकिंग प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी सरकार आपले आयफोन हॅक करत असल्याचा आरोप केला आहे. यानंतर केंद्राची कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) याबाबत तपास करत आहे. सीईआरटीने यासोबतच देशातील सर्व अ‍ॅपल यूजर्सना गंभीर इशारा दिला आहे.

iPhone, iPad, Apple Watch अशा प्रकारचे अ‍ॅपल प्रोडक्ट्स जर तुम्ही वापरत असाल, तर तुम्हाला त्वरीत आपले डिव्हाईस अपडेट करण्याची गरज आहे. अ‍ॅपलच्या कित्येक डिव्हाईसमध्ये असलेल्या त्रुटींमुळे ते सहज हॅक केले जाण्याची शक्यता आहे. सीईआरटीने हॅकिंगला बळी पडू शकणाऱ्या अ‍ॅपल उपकरणांची एक यादी देखील प्रसिद्ध केली आहे.

iPhone Hacking
iPhone Hacking : आयफोन हॅकिंग प्रकरणाचा केंद्राकडून तपास सुरू; अ‍ॅपल कंपनी करणार सहकार्य

10 महिन्यात 28 त्रुटी

सीईआरटीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 महिन्यांत अ‍ॅपल डिव्हाईसेसमध्ये तब्बल 28 त्रुटी समोर आल्या आहेत. एजन्सीने यापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी देखील अ‍ॅपल यूजर्सना इशारा दिला होता. iOS, macOS, tvOS, watchOC अशा ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या डिव्हाईसना अपडेट करुन घेण्याचा सल्ला सीईआरटीने दिला आहे. (Tech News)

हे डिव्हाईस आहेत कमकुवत

  • iOS 17.1 आणि iPadOS 17.1 याहून जुन्या व्हर्जनवर असणारे डिव्हाईस.

  • macOS 14.1 सोनोमा यापूर्वीचे व्हर्जन असणारे डिव्हाईस.

  • macOS 13.6.1 व्हेंचुरा यापूर्वीचे व्हर्जन असणारे डिव्हाईस.

  • macOS 12.7.1 मोंटेरे यापूर्वीचे व्हर्जन असणारे डिव्हाईस.

  • Apple TvOS 17.1 यापूर्वीचे डिव्हाईस.

  • Apple WatchOS 10.1 यापूर्वीचे असणारे डिव्हाईस.

  • Apple Safari 17.1 यापूर्वीचे असणारे डिव्हाईस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com