Chandrayaan 2 : विक्रम उत्तर दे; आज शेवटचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 September 2019

'चांद्रयान-२'चे लँडर विक्रमसाठी आजचा दिवस शेवटचा ठरणार आहे, कारण चंद्रावर आज रात्र होणार असून तेथील तापमान उणे २३२ सेल्सिअस पर्यंत जाणार आहे. एवढ्या कमी तापमानात 'विक्रम' काहीच करू शकत नाही. तसेच त्यामधील संयंत्रे या तापमानाला खराब होऊन जातील. यासंबंधीची अधिकृत घोषणा इस्रो लवकरच करेल.

पुणे : 'चांद्रयान-२'चे लँडर विक्रमसाठी आजचा दिवस शेवटचा ठरणार आहे, कारण चंद्रावर आज रात्र होणार असून तेथील तापमान उणे २३२ सेल्सिअस पर्यंत जाणार आहे. एवढ्या कमी तापमानात 'विक्रम' काहीच करू शकत नाही. तसेच त्यामधील संयंत्रे या तापमानाला खराब होऊन जातील. यासंबंधीची अधिकृत घोषणा इस्रो लवकरच करेल.

चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागाची निरीक्षणे घेण्यासाठी तसेच नवीन वैज्ञानिक संशोधनासाठी 'चांद्रयान-२' ची मोहीम हाती घेण्यात आली. चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरणाऱ्या विक्रमची चाचणी इस्रोने घ्यायची ठरवली परंतु २.१ किमी आधीच संपर्क तुटल्याने ही मोहीम अपूर्ण ठरली आहे. आता आवश्यक ती निरीक्षणे चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटर द्वारे घेण्यात येतील. इस्रोच्या आणि देशाच्या दृष्टीने वैज्ञानिक जगता बरोबरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात बदल घडवणारी ही मोहीम ठरली.

इस्रोच्या अधिकृत अहवालाची सर्वानाच प्रतीक्षा आहे. परंतु आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पडणाऱ्या अंधारात भारताचा विक्रम गडप होणार आहे हे निश्चित.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan 2 Last day for Vikram Lander to respond