Chandrayaan-3 ISRO : कित्येक विक्रम रचणारी 'इस्रो' अखेर कशी झाली सुरू? जाणून घ्या रंजक इतिहास

'चांद्रयान-३'च्या माध्यमातून इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.
Chandrayaan-3 ISRO
Chandrayaan-3 ISROesakal

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज एक नवा इतिहास रचणार आहे. चांद्रयान-३ च्या माध्यमातून चंद्रावर उतरणारा चौथा देश बनण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून हे चांद्रयान अवकाशात झेप घेईल.

गेल्या अनेक दशकांपासून इस्रोने कित्येक ऐतिहासिक कामगिऱ्या पार पाडल्या आहेत. चांद्रयान-१, मंगळयान अशा विविध मोहिमांच्या माध्यमातून इस्रोने जगाला चकित करणारी कामगिरी केली आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर आपलं यान पाठवणारा भारत पहिलाच देश ठरला होता.

जगातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्थांमध्ये इस्रोचाही क्रमांक लागतो. या सगळ्याचं श्रेय जातं, ते म्हणजे विक्रम साराभाई यांना. इस्रोची सुरुवात कशी झाली? साराभाई यांचं त्यात कसं योगदान राहिलं? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Chandrayaan-3 ISRO
Chandrayaan-3 : कशा प्रकारे होणार चांद्रयान लाँच? इस्रोने केली रंगीत तालीम; जाणून घ्या दहा टप्पे

१२ ऑगस्ट १९१९ रोजी जन्म

विक्रम साराभाई यांना काही ठिकाणी भारतातील अवकाश विज्ञानाचे जनक म्हटले जाते, तर काही जण त्यांना भारतीय विज्ञानाचे महात्मा गांधी म्हणतात. त्यांचे कर्तृत्व आणि योगदान आजही देशाला अभिमानास्पद आहे. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी अहमदाबाद येथे एका उद्योगपती कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबाचा भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग होता.

१९४५ मध्ये IIS मध्ये संशोधन

केंब्रिज विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर विक्रम भारतात आले. येथे त्यांना भौतिक शास्त्रज्ञ सर सीव्ही रमण यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकिरणांवरील त्यांचा पहिला संशोधन प्रकल्प सुरू करायचा होता. त्यासाठी ते १९४५ मध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गेले. इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला, ज्यामध्ये त्यांनी विज्ञान जगतात दिलेल्या अनेक योगदानांची एकापाठोपाठ एक नोंद झाली.

Chandrayaan-3 ISRO
ISRO Moon Mission : चांद्रयान-२ पासून धडा घेत केल्या चांद्रयान-३ मध्ये सुधारणा; 'या' गोष्टींमुळे यशस्वी होणार यंदाची मोहीम

इस्रोची स्थापना

विक्रम साराभाई यांनी रशियन क्षेपणास्त्र स्पुटिकच्या प्रक्षेपणानंतर भारतात अंतराळ कार्यक्रम स्थापित करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना केली. साराभाईंच्या प्रयत्नांमुळे १९६९ मध्ये भारताच्या इस्रोची स्थापना झाली. ते इस्रोचे पहिले अध्यक्ष होते. विक्रम साराभाई यांनीच भारत सरकारला स्वतःचा अवकाश कार्यक्रम सुरू करायला हवा असे पटवून दिले.

साइट लाँच

१९६६ मध्ये त्यांनी गुजरातमधील एका गावात नासाच्या मदतीने सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन प्रयोग (SITE) केला. हे १९७५ मध्ये लाँच करण्यात आले, त्यानंतर दूरदर्शन ग्रामीण भागात पोहोचू शकले.

Chandrayaan-3 ISRO
Chandrayaan-3 Launch : पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत किती वेळात पोहोचेल चांद्रयान-3? किती असेल रॉकेटचं स्पीड?

आयआयएम ते अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स

याशिवाय साराभाईंनी देशातील अनेक संस्थांचा पाया रचला. यामध्ये अहमदाबादची आयआयएम आणि भौतिक संशोधन प्रयोगशाळा (पीआरएल) आणि कोलकात्याच्या व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन प्रकल्पाचा समावेश आहे.

त्यांनी त्यांची पत्नी मृणालिनी साराभाई यांच्यासोबत अहमदाबादमध्येच दर्पण अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली. त्यांना १९९६ मध्ये पद्मभूषण आणि १९७२ मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३० डिसेंबर १९७१ रोजी साराभाई यांचे निधन झाले.

Chandrayaan-3 ISRO
Chandrayaan-3 Curtain Raiser : इतिहास रचण्यासाठी उरले काही तास; इस्रोने शेअर केला चांद्रयान-३ मोहिमेचा कर्टन रेजर व्हिडिओ

होमी भाभांचे योगदान

साराभाईंच्या प्रत्येक कर्तृत्वासोबत होमी जहांगीर भाभा यांच्या योगदानाचाही समावेश असल्याचे दिसते. दोघांनी मिळून भारताला विज्ञानाच्या जगात अव्वल स्थानावर नेण्याचे स्वप्न तर पाहिलेच पण ते पूर्णही केले.

डॉ. होमी जे. भाभा यांच्या विमान अपघातातील निधनानंतर १९६६ मध्ये विक्रम साराभाई यांनी अणुऊर्जा विभागाचे अध्यक्षपद स्वीकारले. त्याच वेळी इस्रोच्या स्थापनेसाठी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे मन वळवण्यात होमी जहांगीर भाभा यांचे मोठे योगदान होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com