Chandrayaan 3 Update : 'चांद्रयान-3' बाबत मोठी अपडेट! प्रज्ञान रोव्हरने पार केलं 100 मीटरहून अधिक अंतर

Pragyan Rover : इस्रोने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
Chandrayaan 3 Update
Chandrayaan 3 UpdateeSakal
Updated on

एकीकडे आदित्य एल-1 चे यशस्वीपणे प्रक्षेपण करुन इस्रोने मोठी कामगिरी पार पाडली आहे. तर दुसरीकडे चांद्रयान-3 मोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ संशोधन करत असणाऱ्या प्रज्ञान रोव्हरने 100 मीटरहून अधिक अंतर पार केले आहे. इस्रोने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

इस्रोने आपल्या पोस्टमध्ये एका फोटोच्या माध्यमातून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरची जागा दाखवली आहे. विक्रम लँडर ज्याठिकाणी उतरले, त्या शिवशक्ती पॉइंटपासून काही अंतरावर प्रज्ञान रोव्हर दिसत आहे. हा फोटो जेव्हा घेतला, तेव्हा प्रज्ञानने 101.4 मीटर अंतर पार केले होते असंही यात सांगितलं आहे.

प्रज्ञानचा प्रवास सुरू

चंद्रावरील खड्ड्यांमधून वाट काढत प्रज्ञान रोव्हरचा प्रवास अजूनही सुरू आहे. प्रज्ञानने आतापर्यंत चंद्रावर कित्येक मिनरल्सच्या अस्तित्वाचा शोध लावला आहे. यामध्ये ऑक्सिजन, सल्फर आणि इतर मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. यामध्ये अ‍ॅल्युमिनिअम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मँगनीज आणि सिलिकॉन अशा घटकांचा समावेश आहे.

Chandrayaan 3 Update
Aditya L1 Launch : भारताची सूर्याकडे झेप! 'आदित्य एल-1'चं यशस्वी प्रक्षेपण; पाहा व्हिडिओ

यानंतर आता प्रज्ञान रोव्हर चंद्रावर हायड्रोजनचा शोध घेत आहे. चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वासाठी ऑक्सिजन आणि हायड्रोजन ही दोन्ही मूलद्रव्ये उपलब्ध असणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रज्ञानचा हा शोध संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com