Chandrayaan 3 Moon Pics : 'चांद्रयान-३'ने टिपले चंद्राचे नवीन फोटो; इस्रोने 'एक्स' वर केले पोस्ट

ISRO ने लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेरा (LHDAC) ने टिपलेल्या चंद्राच्या दूरवरील भागाचे काही फोटोज शेअर केले आहेत.
Chandrayaan 3 Moon Pics
Chandrayaan 3 Moon Picsesakal

Mission Chandrayaan 3 : चांद्रयान-3 मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विक्रम लँडर हे बुधवारी, म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. या दरम्यान विक्रम लँडरवरील कॅमेऱ्याने चंद्राचे काही आणखी फोटो टिपले आहेत. इस्रोने आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरून हे फोटो शेअर केले.

इस्रोने आपल्या एक्स पोस्ट मध्ये याबाबत अधिक माहिती दिली आहे. चंद्राचे हे फोटो लँडर हॅजार्ड डिटेक्शन अँड अव्हॉईडन्स कॅमेऱ्याने (LHDAC) टिपले आहेत. हा कॅमेरा चांद्रयानाच्या लँडिंगसाठी सुरक्षित जागा शोधण्यास मदत करेल. चंद्रावर बहुतांश ठिकाणी खडकाळ आणि खड्डे असलेली जमीन आहे. त्यामुळे लँडिंगसाठी एखादी सपाट जागा शोधणं गरजेचं आहे. यासाठी हा कॅमेरा उपयोगी ठरणार आहे.

'चांद्रयान-3'ने टिपलेले हे फोटो चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील आहेत. चंद्राचा हा भाग आतापर्यंत मानवापासून लपून राहिला होता. या चार फोटोंमध्ये चंद्रावरील विविध क्रेटर्स दिसत आहेत.

कधी होणार लँडिंग?

14 जुलै रोजी चांद्रयान-3 चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. आता 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास विक्रम लँडर हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. हे लँडिंग यशस्वी ठरल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरणार आहे. तसंच, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरेल. यामुळे हा क्षण अगदी ऐतिहासिक असणार आहे.

Chandrayaan 3 Moon Pics
Chandrayaan 3 : रशियाच्या आधी चंद्राजवळ पोहोचूनही 'चांद्रयान 3'ला लवकर लँडिंग का शक्य नाही? जाणून घ्या

देशभरातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांना या ऐतिहासिक घटनेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक शाळेच्या आवारात हा महत्वाचा क्षण बघण्यासाठी चांद्रयान-3 सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रसारण आयोजित करण्यासाठी संस्थांना आमंत्रित केले आहे.

Chandrayaan 3 Moon Pics
Chandrayaan-3 Update : चांद्रयानचं आणखी एक पाऊल पुढे! उरले फक्त २५ किमी; मॉड्यूलचे अंतिम डीबूस्टिंगही यशस्वी

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचा समावेश असलेल्या, चांद्रयान-3 लँडर मॉड्यूलमध्ये बहुआयामी मिशन उद्दिष्टे साध्य करण्याची ताकद आहे. मुख्य उद्दिष्टांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सौम्य स्पर्श करणे, चंद्राच्या वातावरणात रोव्हरच्या मदतीने प्रभावी प्रात्यक्षिक आणि सर्वात महत्वाच्या इन-सीटू वैज्ञानिक प्रयोगांची अंमलबजावणी यांचा समावेश आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या वैशिष्ट्यांचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी तयार केलेल्या वैज्ञानिक उपकरणांच्या श्रेणीसह सुसज्ज आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com