चंद्रावर पाणी आहे! ध्रुवीय प्रदेशात सापडले बर्फाचे साठे 

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

वॉशिंग्टन : चंद्रावर पाणी असल्याच्या दाव्याला भारताच्या 'चांद्रयान-1'कडून आलेल्या माहितीमुळे पुष्टी मिळाली आहे, असे 'नासा'ने आज (बुधवार) सांगितले. चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशांमधील सर्वांत थंड असलेल्या भागामध्ये गोठलेल्या पाण्याचे अवशेष आढळून आले आहेत. यामुळे चंद्रावर जीवसृष्टी असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. 

भारताने दहा वर्षांपूर्वी 'चांद्रयान' प्रक्षेपित केले होते. त्याद्वारे मिळालेल्या माहितीचे विश्‍लेषण करून 'नासा'ने हा निष्कर्ष काढला आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून काहीच मिलिमीटर खाली बर्फाचे हे अवशेष सापडले आहेत. त्यामुळे भविष्यातील चांद्रमोहिमांमधून सखोल माहिती मिळविता येऊ शकते, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात सापडलेले बर्फ मोठ्या भागात विखुरलेले आहे. हे अवशेष प्राचीन काळापासून असू शकतील, असे 'पीएनएएस' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात नमूद करण्यात आले आहे. 2008 मध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या 'चांद्रयान-1'वर 'नासा'चे 'मून मिनरोलॉजी मॅपर' हे यंत्रही होते. चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी 'नासा'ने हे यंत्र तयार केले होते. 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे अवशेष असू शकतील, असे संकेत यापूर्वीच्या अभ्यासांतून मिळाले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan I data confirms presence of ice on Moon