ChatGPT वापरामुळे विचार करण्याच्या कौशल्याला धोका? मेंदूच्या विकासावर गंभीर परिणाम; MIT च्या संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

MIT research reveal Chat GPT AI Risk to Critical Thinking Skills : नुकतेच MIT च्या नव्या अभ्यासानुसार, ChatGPT सारख्या AI टूल्सचा अति वापर विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीवर नकारात्मक परिणाम करू शकतो.
MIT research reveal Chat GPT AI Risk to Critical Thinking Skills
MIT research reveal Chat GPT AI Risk to Critical Thinking Skillsesakal
Updated on

Critical Thinking Skills AI Risk : नामांकित MIT Media Lab च्या नव्या अभ्यासानुसार, ChatGPTसारख्या AI साधनांचा अति वापर तरुणांच्या मेंदूच्या सक्रियतेवर परिणाम करत असूनत्यांच्या विचारशक्तीला बाधा पोहोचवत आहे.

या अभ्यासात १८ ते ३९ वयोगटातील ५४ जणांना तीन गटांत विभागून SAT निबंध लिहिण्याचे काम दिले गेले. एक गट ChatGPT वापरत होता, दुसरा Google सर्च वापरत होता आणि तिसऱ्या गटाने कोणतीही डिजिटल मदत घेतली नाही. EEG मशीनद्वारे मेंदूतील ३२ भागांमधील सक्रियता मोजण्यात आली.

याचा निष्कर्ष धक्कादायक ठरला ChatGPT वापरणाऱ्या गटात मेंदूची सक्रियता सर्वात कमी होती. त्यांनी लिहिलेल्या निबंधांमध्ये सर्जनशीलता, वैयक्तिक विचार आणि विविधता जवळजवळ नव्हतीच. अभ्यासात स्पष्ट झाले की, सुरुवातीला काही प्रमाणात विचार करून लिहिलेल्या निबंधांऐवजी पुढील निबंध केवळ ChatGPT च्या प्रतिलिपीवर (copy-paste) आधारित होते.

MIT Media Lab मधील संशोधक नतालिया कोस्मायना म्हणाल्या, “ही माहिती लगेच जाहीर करण्यामागचे कारण म्हणजे समाजातील धोके वेळेत लक्षात यावेत. जर आपण लहान वयातच AI वापर अनियंत्रितपणे सुरू केलं, तर त्याचा मेंदूच्या वाढीवर विपरित परिणाम होऊ शकतो.”

MIT research reveal Chat GPT AI Risk to Critical Thinking Skills
Moto G96 Launch : एकच झलक, सबसे अलग! लॉन्च होतोय Moto G96 स्मार्टफोन; परडवणारी किंमत अन् दमदार फीचर्स, पाहा एका क्लिकवर..

Google सर्च वापरणाऱ्या ग्रुपनेही समाधानकारक निबंध लिहिले, पण ChatGPTच्या तुलनेत त्यांच्यात वैचारिक सहभाग अधिक होता. मेंदूच्या अल्फा, थीटा आणि डेल्टा वेव्ह्ज जास्त प्रमाणात सक्रिय होत्या या लाटा सर्जनशीलता आणि स्मृतीशी संबंधित असतात.

अभ्यासानंतर पुन्हा एकदा निबंध लिहिण्याचे काम देण्यात आले, मात्र यावेळी ChatGPT गटाला हे टूल वापरण्यास मनाई केली होती. त्यांच्या मेंदूतील स्मरणशक्ती आणि संज्ञानात्मक सक्रियता अत्यंत कमी होती, जे दर्शवते की AI वापरामुळे त्यांनी ज्ञान आत्मसात केलं नव्हतं.

या अभ्यासाचे निष्कर्ष अद्याप समीक्षणासाठी सादर केले आहेत पण संशोधकांच्या मते, धोका इतका गंभीर आहे की धोरणनिर्मात्यांनी लगेच लक्ष देणे गरजेचे आहे.

MIT research reveal Chat GPT AI Risk to Critical Thinking Skills
Google AI : गुगलचा नवा 'AI मोड' भारतात लॉन्च! रोजच्या जीवनात आहेत भन्नाट फायदे, कसं वापराल बघा एका क्लिकवर..

बालमनोचिकित्सकच्या मते, लहान वयात AI चा अतिवापर मनोविकसनासाठी घातक ठरू शकतो. “ही टूल्स जरी सोपी वाटली, तरी त्याचा दीर्घकालीन परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो,” असे ते म्हणाले. गमतीशीर म्हणजे अभ्यास प्रकाशित होताच अनेक लोकांनी याचे सारांश आता कोस्मायना आणि त्यांची टीम सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगसंदर्भात दुसरा अभ्यास करत असून, त्याचे निष्कर्ष अजूनही गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.

हा अभ्यास स्पष्टपणे सूचित करतो की, ChatGPTसारख्या टूल्सचा योग्य वापर शिक्षणासाठी फायदेशीर ठरू शकतो, पण त्यांचा अतिरेकी वापर विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा ह्रास करणारा ठरू शकतो. त्यामुळे धोरणात्मक मार्गदर्शन आणि काळजीपूर्वक अंमलबजावणी ही काळाची गरज आहे.

MIT research reveal Chat GPT AI Risk to Critical Thinking Skills
Video : डोळ्यात अश्रू तरी सुनेसोबत धरला ठेका! शुभांशू शुक्ला यांच्या यानाने उड्डाण केल्यावर आई झाली भावुक Video व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com