Cypher 2023 : चॅटजीपीटीने लिहिलं गाणं, अन् बँडने केला लाईव्ह परफॉर्मन्स; व्हिडिओ होतोय व्हायरल

या प्रसंगाचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया साईटवर व्हायरल होतो आहे..
Cypher 2023 ChatGPT Song
Cypher 2023 ChatGPT SongeSakal

चॅटजीपीटी आल्यापासून एआयची चर्चा जगभर सुरू आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स काय काय करु शकते याबाबत दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात तर ChatGPTने गाणं लिहून दाखवलं. एवढंच नाही, तर एका बँडने चक्क ते लाईव्ह परफॉर्म देखील केलं.

या प्रसंगाचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया साईटवर व्हायरल होतो आहे. सायफर 2023 या इव्हेंटमध्ये बंगळुरूतील स्वरात्मा या बँड ग्रुपने परफॉर्मन्स केला होता. या ग्रुपने स्टेजवरच चॅटजीपीटीला एक आठ ओळींचं गाणं लिहायला सांगितलं. या एआयने क्षणातच हे गाणं लिहून दिलं, आणि ग्रुपनेही ते लाईव्ह परफॉर्म केलं.

चॅटजीपीटीने यावेळी समोर बसलेल्या प्रेक्षकांमधील एका महिलेवर गाणं लिहिलं. या महिलेबाबत थोडी माहिती देऊन, तिने लाल ड्रेस परिधान केला असल्याचं चॅटजीपीटीला सांगण्यात आलं. (Tech News)

एक्सवर अपलोड केल्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. यावर यूजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. सायफर 2023 या इव्हेंटमध्ये कित्येक प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान सादर करण्यात आले. याठिकाणी 'जेन एआय'ची टीम जेनपॅक्ट देखील आली होती. या इव्हेंटला भारतातील सर्वात मोठी एआय समिट म्हटलं जात आहे. या इव्हेंटला प्रसिद्ध क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स हादेखील उपस्थित होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com