
थोडक्यात
चॅटजीपीटीच्या नवीन एजंट टूलमुळे एका कमांडवर वेब ब्राउझिंग, कोडिंग आणि प्रेझेंटेशन झटपट तयार होतात.
ओपनएआयचे हे स्मार्ट टूल मल्टीटास्किंग सुलभ करून वेळ वाचवते आणि कार्यक्षमता वाढवते.
कनेक्टर्स आणि कस्टम इन्स्ट्रक्शन्सद्वारे वापरकर्त्याच्या गरजेनुसार अचूक कामे पूर्ण होतात.
ChatGPT agent for instant task automation: ओपनएआयने चॅटजीपीटी हा चॅटबॉट लाँच केल्यापासून कंपनी सतत चर्चेत आहे. चॅटजीपीटीच्या लोकप्रियतेनंतर टेक कंपन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने चॅटबॉट्स आणले आहेत. चॅटजीपीटी अजूनही अव्वल स्थानावर आहे. ओपनएआय सतत चॅटजीपीटी अपग्रेड करत राहते. ज्यामुळे यूजर्संना नवीन अनुभव मिळून काम सोपे होतील. दरम्यान, कंपनीने चॅटबॉटमध्ये एक उत्तम टूल जोडले आहे. कंपनीने त्याचे नाव चॅटजीपीटी एजंट ठेवले आहे.
चॅटजीपीटी एजंट लाखो यूजर्स उत्तम सुविधा देणार आहे. त्याच्या नावावरूनच असे सूचित होते की ते तुमच्यासाठी एजंटसारखे काम करेल. चॅटजीपीटीचे हे एजंट टूल यूजर्सच्या संगणकाचा वापर करून यूजर्ससाठी काम करू शकते. याच्या मदतीने, तुमची अनेक कामे अगदी वेगाने होणार आहेत.