Jio Prepaid Plan : Jio चे 365 दिवसांचे प्लॅन, मिळते फ्री कॉलिंग, दररोज 3GB पर्यंत डेटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cheapest jio 365 days validity prepaid plans 2022 with unlimited calling and upto 3gb daily data check list

Jio चे 365 दिवसांचे प्लॅन, मिळते फ्री कॉलिंग, दररोज 3GB पर्यंत डेटा

रिलायन्स जिओ (reliance jio) ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर आहे आणि ती आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन ऑफर करते. जर तुम्हाला दर महिन्याला रिचार्जच्या त्रासापासून सुटका मिळवायची असेल, तर कंपनी असे काही प्लॅन ऑफर करते ज्यांची वैधता एक वर्ष म्हणजेच 365 दिवस असते. आज आम्ही तुमच्यासाठी Jio च्या 365 दिवसांची वैधता असलेल्या प्लॅनची ​​संपूर्ण यादी घेऊन आलो आहोत

1. Reliance Jio चा 2879 रुपयांचा प्लॅन - जिओचा हा प्लॅन सर्वात स्वस्त प्लॅन आहे जो 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 2GB हायस्पीड इंटरनेट डेटा मिळतो. म्हणजेच एका वर्षात कंपनी या प्लॅनसोबत 730 जीबी डेटा देते. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64 Kbps पर्यंत कमी होतो. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. याशिवाय प्लॅनसोबत JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud अॅप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

2. रिलायन्स जिओचा 2999 रुपयांचा प्लॅन - जिओचा हा प्लॅन Jiomart महाकॅशबॅक ऑफर अंतर्गत येतो. या 365 दिवसांच्या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे यामध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो. म्हणजेच, प्लॅनची ​​वैधता संपेपर्यंत तुम्हाला एकूण 912.5 GB हायस्पीड डेटाचा लाभ मिळेल. दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64 Kbps पर्यंत घसरतो. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायदे म्हणून, JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud अॅप्सना प्लॅनमध्ये मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

हेही वाचा: रशियाला आणखी एक आर्थिक झटका; व्हिसा, मास्टरकार्डने बंद केली सेवा

3. रिलायन्स जिओचा 3119 रुपयांचा प्लॅन- कंपनीचा हा प्रीपेड प्लॅन देखील 365 दिवसांच्या वैधतेसह आहे, ज्यामध्ये दररोज 2GB डेटा लाभ मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये 10GB अतिरिक्त डेटा मिळतो. यामध्ये तुम्हाला 365 दिवसांच्या कालावधीत एकूण 740GB डेटा लाभ मिळतो. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर लोकल आणि एसटीडीच्या अमर्यादित कॉलिंग मिळते. प्लॅनसह, दररोज 100 एसएमएस फ्री उपलब्ध आहेत. याशिवाय हा प्लॅन Disney + Hotstar, JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud सारख्या अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देखील देतो.

हेही वाचा: Hyundai i20 चे दोन नवीन व्हेरिएंट, मिळाले सनरूफसह अनेक दमदार फीचर्स

4. रिलायन्स जिओचा 4199 रुपयांचा प्लॅन - कंपनीचा हा प्लॅन देखील 365 दिवसांच्या वैधतेसह आहे, ज्यामध्ये दररोज 3GB डेटा उपलब्ध आहे. यासोबत तुम्हाला एकूण 1095 जीबी डेटाचा लाभ मिळतो. प्लॅनमध्ये अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे आणि दररोज 100 एसएमएस देखील फ्री उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांमध्ये प्लॅनसह Disney+ Hotstar, JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud सारख्या अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देखील आहे.

रिलायन्सचे हे सर्व प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतात. या प्लॅन अशा ग्राहकांसाठी अधिक उपयुक्त आहेत ज्यांना जास्त काळ वैधतेसह अधिक डेटा हवा आहे. यासोबतच तुम्ही Jio अॅप्स आणि OTT अॅप्सच्या माध्यमातून मनोरंजनाचा लाभही घेऊ शकता.

हेही वाचा: 500 पेक्षा कमीत Jio, Airtel अन् Vi चे डेली 2GB डेटासह बेस्ट प्लॅन

Web Title: Cheapest Jio 365 Days Validity Prepaid Plans 2022 With Unlimited Calling And Upto 3gb Daily Data Check List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JioPrepaid Plan