China Fastest Internet : जगातील सर्वात वेगवान इंटरनेट लाँच! एका सेकंदात डाऊनलोड होतील 150 एचडी मूव्हीज

China Internet Speed : जगातील सर्वात प्रमुख वेगवान इंटरनेट सेवांच्या तुलनेत या इंटरनेटचा वेग कमीत कमी 10 पटींनी जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे.
China Fastest Internet
China Fastest InterneteSakal

World's Fastest Internet : चीनमधील तंत्रज्ञान सध्या झपाट्याने प्रगती करत आहे. यातच चीनमध्ये आता जगातील सर्वात वेगवान इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. या इंटरनेटचा स्पीड एवढा जास्त आहे, की एका सेकंदात सुमारे 150 एचडी चित्रपट ट्रान्सफर करता येतील. देशातील काही शहरांमध्ये ही सेवा सुरू केली आहे.

या इंटरनेटचा स्पीड हा 5Gच्या तुलनेत अगदीच जास्त आहे. 5G इंटरनेटचा स्पीड हा साधारणपणे 20 GBPS (20 गिगाबाईट्स प्रति सेकंद) एवढा असतो. तर चीनमध्ये सुरू केलेल्या नव्या इंटरनेटचा स्पीड हा तब्बल 1.2 TBPS, म्हणजेच 1200 गिगाबाईट्स प्रति सेकंद एवढा आहे.

China Fastest Internet
China Shenzhou-17 : चीनने अंतराळात पाठवले आतापर्यंतचे सर्वात तरुण अवकाशवीर, स्पेस स्टेशनवर झाले दाखल; पाहा व्हिडिओ

शिंघुआ युनिवर्सिटी, चायना मोबाईल, हुआवे टेक्नॉलॉजीस आणि सर्नेट कॉर्परेशन या चार कंपन्यांनी मिळून या इंटरनेट प्रकल्पावर काम केलं आहे. जगातील सर्वात प्रमुख वेगवान इंटरनेट सेवांच्या तुलनेत या इंटरनेटचा वेग कमीत कमी 10 पटींनी जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. जगातील कित्येक इंटरनेट सेवा या केवळ 100 GBPS एवढ्या वेगाने इंटरनेट देतात. तर अमेरिकेतील सर्वात वेगवान इंटरनेट देखील 400 GBPS एवढाच स्पीड देतं. (Tech News)

देशातील प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध

हे हायस्पीड इंटरनेट नेटवर्क तब्बल 3,000 किलोमीटर भागात पसरलेलं आहे. यासाठी ऑप्टिकल फायबर केबल्सचा वापर केला आहे. बीजिंग, वुहान आणि गुआंगजो या शहरांमध्ये हे नेटवर्क पसरलं आहे. हे नेटवर्क जुलैमध्ये सुरू करण्यात आलं होतं. मात्र, याच्या इतर चाचण्या सुरू होत्या. अखेर सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर सोमवारी त्याचं अधिकृत लाँचिंग करण्यात आलं.

China Fastest Internet
China New Virus : चिनी वैज्ञानिकांनी शोधले आठ नवे विषाणू, माणसांमध्ये होऊ शकतं संक्रमण; आणखी एका महामारीचा धोका?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com