China Moon Mission : चंद्रावरची माती आणि खडक पृथ्वीवर येणार? चीनचं 'हे' यान चंद्राच्या पाठीमागील भागावर लँड

Chang'e-6 Mission : चंद्राच्या 'त्या' अंधारलेल्या भागावर जाणारा पहिलाच देश
China's Chang'e-6 Makes History with Far Side Lunar Landing
China's Chang'e-6 Makes History with Far Side Lunar Landing

Moon Mission : सध्या अनेक देशांकडून वेगवेगळ्या अंतराळ मोहीमा राबवल्या जात आहेत. काही यशस्वी होत आहेत तर काही अयशस्वी. अश्यातच चीनने देखील अंतराळ मोहिम राबवली होती. चीनने रविवारी चंद्राच्या पाठीमागील भागात यशस्वी लॅण्डिंग केले आहे.

ही एक ऐतिहासिक मोहीम असून यात जगातील पहिल्यांदा चंद्राच्या अंधारलेल्या भागातील खडक आणि मातीचे नमुने गोळा करण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

या यशस्वी लॅण्डिंगमुळे चंद्रापर्यंत पोहोचण्याच्या स्पर्धेत चीनची अंतराळ शक्ती म्हणून ओळख वाढली आहे. अमेरिका सह अनेक देश पुढील दशकात दीर्घकालीन अंतराळवीर मोहिमांसाठी चंद्राच्या खनिजांचा वापर करण्याच्या विचारात आहेत.

China's Chang'e-6 Makes History with Far Side Lunar Landing
NASA ने शेअर केले Black Hole चे 'हे' फोटो पाहून व्हाल थक्क

चिनी अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणण्यानुसार, चांग'ए-६ (Chang'e-6) हे यान अनेक उपकरणांनी सुसज्ज असून ते चंद्राच्या सतत सूर्य प्रकाशाखाली असणाऱ्या बाजूला असलेल्या दक्षिण ध्रुव - एटकेन बेसिन या विशाल खड्ड्यात सकाळी ६:२३ वाजता (बेंजिंग वेळ) यशस्वीरीत्या उतरले आहे.

CNSA ने आपल्या वेबसाइटवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "या मोहिमेमध्ये अनेक अभियांत्रिकी नावीन्यपूर्ण गोष्टींचा समावेश आहे. तसेच यात धोका आणि आव्हानही मोठे होते. चांग'ए-६ (Chang'e-6) यानाद्वारे घेऊन जाणारी उपकरणे नियोजनानुसार कार्य करतील आणि वैज्ञानिक शोध मोहिमा राबवतील."

ही यशस्वी मोहीम चंद्राच्या पाठीमागची चीनची दुसरी मोहीम आहे. या अंधारलेल्या भागापर्यंत आत्तापर्यंत कोणत्याही देशाने पोहोचलेले नाही. चंद्राचा पाठीचा भाग पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला असतो. या भागातील खोल आणि अंधारलेल्या खड्ड्यांमुळे येथे संपर्क आणि रोबोटिक लॅण्डिंग ऑपरेशन अधिक कठीण होऊ शकतात.

चांग'ए-६ हे यान स्कूप आणि ड्रिलच्या मदतीने चंद्राच्या २ किलो (४.४ पाउंड) इतके मातीचे आणि खडकांचे नमुने गोळा करेल आणि ते पुन्हा पृथ्वीवर आणेल.

China's Chang'e-6 Makes History with Far Side Lunar Landing
Nebula Images: NASAने टिपलेले तेजोमेघाचे हे फोटो पाहिलेत का?

हे नमुने लॅण्डरवर असलेल्या रॉकेट बूस्टरवर हलविल्यानंतर चंद्राच्या कक्षेत असलेल्या दुसऱ्या अंतराळयानासोबत जोडले जातील आणि पुन्हा पृथ्वीवर परत येतील. या मोहिमेअंतर्गत हे यान मंगोलिया प्रदेशात जून २५ च्या आसपास उतरेल अशी अपेक्षा आहे.

सर्वकाही नियोजनानुसार झाले तर ही मोहीम चंद्राच्या ४.५ अब्ज वर्षांच्या इतिहासावर आधारित मौलिक माहिती देईल आणि सूर्यमालेच्या निर्मितीबाबत नवे शोध नोंदवेल. तसेच चंद्राच्या या अज्ञात भागाची चांग'ए-५ मोहिमेद्वारे संकलित केलेल्या नमुन्यांच्या तुलना करून चंद्राबद्दल अधिक माहिती मिळवता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com