फुकट घेतलेले महागले अन्‌ ग्राहक पस्तावले!

फुकट घेतलेले महागले अन्‌ ग्राहक पस्तावले!
फुकट घेतलेले महागले अन्‌ ग्राहक पस्तावले!
फुकट घेतलेले महागले अन्‌ ग्राहक पस्तावले!
Summary

आता इन्कमिंग कॉलसाठी महिनाकाठी शंभर रुपये मोजावे लागणार असल्याने, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) संकटातून नागरिक सावरत असताना, शासनाने पेट्रोल (Petrol) - डिझेल (Diesel), गॅसच्या (LPG Gas) किमती वाढवल्याने सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. आता या महागाईच्या झळा जीवनावश्‍यक बनलेल्या मोबाईल (Mobile Phone) रिचार्जच्या किमतीपर्यंत पोचल्या आहेत. नुकतेच दोन खासगी दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली आहे. आता इन्कमिंग कॉलसाठी महिनाकाठी शंभर रुपये मोजावे लागणार असल्याने, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

फुकट घेतलेले महागले अन्‌ ग्राहक पस्तावले!
वडिलांच्या राज्यमंत्रिपदाचा डामडौल न करता निर्माण केली स्वत:ची ओळख!

हाताला काम नाही, रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत असताना, जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमतीत दररोज भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्‍किलीचे झाले आहे. त्यात आणखी भर म्हणजे, दोन खासगी दूरसंचार मोबाईल कंपन्यांनी रिचार्ज किमतीत वाढ केली आहे. सध्या मोबाईल हा सर्वसामान्यांशी कनेक्‍ट झालेला आहे. माहिती आणि दळणवळणाच्या माध्यमासाठी मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. कोरोना काळात तर याचे महत्त्व अधिक व्यापक बनले गेले आहे.

खासगी दूरसंचार मोबाईल कंपन्यांनी नागरिकांना काही वर्षांपूर्वी मोफत सिमकार्ड वाटप करून, इंटरनेटसह अनलिमिटेड कॉलिंगच्या अनेक सुविधा माफक दरात उपलब्ध करून देत भुरळ घातली. त्यामुळे संपूर्ण जग कवेत आल्याप्रमाणे मोबाईल कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर ग्राहक कनेक्‍ट झाले. परंतु, ग्राहक वाढताच नेटवर्क सेवा ढासळली आहे. तरीदेखील कंपन्यांकडून गेल्या वर्षीपासून सुविधा महाग करण्यात आल्या आहेत. त्यात 26 नोव्हेंबर रोजी आणखी भर पडली आहे. प्रीपेड कंपनीचे सर्व रिचार्ज 20 ते 25 टक्‍क्‍यांनी महाग केले आहेत. फुकट घेतलेलं महागल्याने ग्राहक चांगलेच पस्तावले आहेत.

सोशल मीडियामुळे इंटरनेटचे जाळे गावागावांत विणले आहे. त्यात युवकांमध्ये गेल्या सहा ते सात वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ग्राहकांना नाममात्र दरात दिली जाणारी सेवा आता महागाईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असल्याने, सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या युवक- युवतींना याची झळ नक्कीच बसणार आहे. त्यामुळे या खासगी दूरसंचार मोबाईल कंपन्यांच्या दरवाढीवर शासनाने अंकुश ठेवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.

असे आहेत नवे दर

दोन खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जमध्ये 20 ते 25 टक्‍क्‍यांची वाढ केली आहे. या दोन्ही कंपन्यांची सेवा वापरायची झाल्यास आता किमान 99 रुपये मोजावे लागतील. याआधी त्यासाठी 79 रुपये आकारले जायचे. त्याशिवाय मासिक रिचार्ज 149 वरून 179, द्वैमासिक 399 वरून 469, त्रैमासिक 599 वरून 719 वर पोचले आहे. परिणामी खिशावर ताण पडणार असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

फुकट घेतलेले महागले अन्‌ ग्राहक पस्तावले!
ठाकरे सरकारची कोलांटउडी! दोन लाखांवरील कर्जमाफी नाहीच

खाजगी दूरसंचार मोबाईल कंपन्यांनी सिमकार्ड घेताना इन्कमिंग कॉल कायमस्वरूपी अनलिमिटेड या तत्त्वावर दिले होते. परंतु, सध्या त्यासाठी देखील महिन्याकाठी शंभर रुपये मोजावे लागणार असल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

- सतीश उमाटे, वितरक, मोबाईल रिचार्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com