Citron C3 Aircross : फ्रेंच कंपनीने भारतात लाँच केली स्वस्तात मस्त SUV, ह्युंडाई-कियाला देणार टक्कर! पाहा फीचर्स

Citron C3 Aircross : दोन्ही गाड्यांच्या तुलनेत किंमत कमी
Citron C3 Aircross
Citron C3 Aircross

Citron C3 Aircross : तुम्ही जर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ती म्हणजे फ्रान्स देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असलेली Citroen हि आपली नवीन SUV भारतात आणत आहे. भारतात हा कंपनीने SUV C3 Aircross लॉन्च केली आहे.

ही कार दिसायला अगदीच स्टायलिश आणि आकर्षक आहे. अगदी पॉवरफुल इंजिन असणाऱ्या या कारची किंमत केवळ 9.99 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.या कारच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. अवघे 25 हजार रुपये भरुन तुम्ही ही कार बुक करू शकता.

Citron C3 Aircross
Car Airbags : सगळंच Airbagsच्यावर सोडून मोकळं होऊ नका, काहीवेळा Airbags उघडतच नाहीत,कारण...

ही कार भारतात आधीपासून असणाऱ्या किया सेल्टोस आणि ह्युंडाई क्रेटाला टक्कर देणार आहे. या दोन्ही गाड्यांची अनुक्रमे किंमत 10.90 लाख आणि 10.87 लाख एवढी आहे. या दोन्ही गाड्यांच्या तुलनेत कमी किंमत असल्यामुळे Citron ला फायदा होणार आहे.

या कारच्या पुढच्या बाजूस LED डे टाइम रनिंग लाइट्स (DRL's) आणि मोठा ग्रील आहे. १७ इंचांचे चाकं आहेत. हि गाडी एसयूवी 5-सीटर और 7-सीटर दोघांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने यात 1.2 लिटर क्षमतेचे पेट्रेल इंजिन लावले आहेत.

Citron C3 Aircross
Car Care Tips : आता कारमध्ये वाटेल गार-गार; AC मध्ये करा एवढाच बदल, मायलेजसुद्धा वाढेल

या कारच्या Mid आणि Top वेरियंटमध्ये 10 inch touchscreen infotenment system, डिजिटल इंस्टामेन्ट क्लस्टर, आऊट साईड रियल ब्ल्यू मिरर, टायर pressure मॉनिटरिंग सिस्टिम, revers parking system आधी महत्वाच्या गोष्टी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com