Common Charger: कटकटचं संपली! मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटसाठी आता एकच चार्जर लागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Common Charger Policy'

Common Charger: कटकटचं संपली! मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटसाठी आता एकच चार्जर लागणार

आजच्या डिजिटलायझेशच्या जगात मोबाईल, लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यामुळे या सर्व गॅझेट्सची काळजीही घ्यावी लागते. वेगवेगळ्या गॅझेट्सचे चार्जरही कॅरी करावे लागतात. अशात चार्जर सांभाळण्याचं एक वेगळं टेन्शन असते.

पण जर लॅपटॉप, मोबाईल किंवा टॅब्लेटसाठी एकच चार्जर असले तर.. ? हो, हे खरंय. आता स्मार्ट गॅझेटसाठी एकच कॉमन चार्जर मार्केटमध्ये येणार आहे. सध्या या चार्जरची मार्केटमध्ये खूप चर्चा आहे. (Common Charger Policy For Smart Device mobile smartphones laptop )

विशेष म्हणजे या चार्जिंगसाठी 'युएसबी-सी'चा (USB-C) वापर करण्यात असून यावर संबंधीत तज्ञांनी यावर सहमती दिली आहे. सध्या या चार्जरबाबत ग्राहकांमध्ये उत्सूकता आहे. मात्र हा चार्जर कधी येणार. हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

ग्राहक विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह याबाबत सांगताना म्हणाले की,स्मार्ट डिव्हाइससाठी एक कॉमन चार्जर बाजार आणण्यात यावे, यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता सर्व डिव्हाईससाठी एकच कॉमन चार्जर असणार आहे.

एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मोबाईल प्रोडक्शन कंपन्यांचे प्रतिनिधी, व्यापारी संघटना, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, आयआयटीचे अधिकारी तसेच केंद्र सरकारच्या विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: छोटा पिन - टाईप C चार्जरवरून होणारी भांडणे मिटवणारा Common Charger कधी येणार ?

 ई-कचरा असणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमाकांवर आहे. विशेष म्हणजे या चार्जरमुळे ई-कचऱ्यावर आळा बसणार. सोबतच ग्राहकांना अनेक डिव्हाईसला एकच चार्जर वापरणे अधिक सुलभ होणार.