कव्हरच करणार मोटारींचे वादळापासून संरक्षण!

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

अमेरिकेसारख्या देशात चक्री वादळांमुळे दरवर्षी मोठी हानी होते. यात चारचाकी गाड्यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. गारांच्या वर्षावामुळे दरवर्षी अडीच लाखांपेक्षा अधिक मोटारचालक विमा कंपनीकडे नुकसानभरपाईचा दावा करतात. मात्र, आता हेल प्रोटेक्‍टर नावाच्या कव्हरमुळे मोटारींचे वादळ व गारांपासून रक्षण होईल.

हे कव्हर केवळ पाच मिनिटांत मोटार किंवा ट्रकला संरक्षण देते. टेक्‍सासमधील मायकेल सिसिलियाने या कव्हरची निर्मिती केली आहे. धोक्‍याचा इशारा देणाऱ्या ऍपसमवेत हे काम करते. या ऍपमुळे चालकाला कार्यालय व घरासह चार ठिकाणांहून संभाव्य वादळाची अर्धा तास आधी सूचना मिळते. अर्थात, मोटारीवर कव्हर झाकणे सोपे नाही. ही सूचना मिळाल्यानंतर रिमोटच्या साह्याने हे कव्हर मोटारीवर टाकावे लागते.

रिमोटवरील बटणाला कारच्या बॅटरीतून पॉवर सप्लाय देण्यात आला आहे. कलिंगड, नारळ, खरबूज अशा पदार्थांवर या यंत्रणेची चाचणी घेतली आहे. हेल प्रोटेक्‍टर 10 ते 22 फूट अशा सहा आकारात उपलब्ध आहे. या कव्हरची किंमत 349 डॉलरपासून आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The cover will protect you from the windy storm models!

टॅग्स