CROPIC App : ‘क्रॉपिक’ अॅपद्वारे प्रत्यक्ष शेतातील छायाचित्रांचे विश्लेषण करून पिकांची स्थिती आणि नुकसान समजून घेतले जाईल. ही योजना शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक ठरणार आहे.
प्रत्यक्ष शेतातील छायाचित्रे आणि ‘एआय’चा वापर करून क्रॉपिक (CROPIC) नावाची एक विशेष यंत्रणा कृषी मंत्रालयाकडून प्रत्यक्षात येणार आहे. देशातील कृषी विभागाचा ‘पॅटर्न’ नक्की काय आहे, ते शोधण्याचा प्रयत्न ही ‘अॅप’आधारित यंत्रणा करणार आहे.