BMW Car: सोनू सूदचा थाटच वेगळा! ०००७ नंबरसह खरेदी केली BMW, जाणून घ्या किंमत-फीचर्ससह संपूर्ण माहिती

अभिनेता सोनू सूदने BMW 7 Series मधील नवीन कार खरेदी केली आहे. ही कार जबरदस्त फीचर्ससह येते.
Sonu Sood
Sonu SoodSakal
Updated on

Sonu Sood New Car: अभिनेता सोनू सूद हा अभिनयापासून ते सामाजिक कार्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी नेहमीच चर्चेत असतो. आता सोनू सूद आपली नवीन कार BMW 7 Series मुळे चर्चेत आला आहे. त्याने व्हीआयपी नंबरसह या कारला खरेदी केले आहे. त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर या नवीन कारसोबतच फोटो शेअर केला असून, त्याने खरेदी केलेली कार BMW 7 Series 740Li Individual M Sport Edition आहे. कारप्रमाणेच याचा नंबर देखील खास आहे.

हेही वाचा: Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

सोनू सूदच्या या कारचा नंबर ०००७ असा आहे. BMW 7 Series 740Li Individual M Sport Edition कार पॉवरफुल इंजिनसह येते. या कारच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

BMW 7 Series 740Li Individual M Sport Edition ची किंमत

BMW 7 Series 740Li Individual M Sport Edition ची एक्स-शोरुम किंमत १,५१,५०,००० रुपये, तर ऑन रोड किंमत १,७२,९०,२२१ रुपये आहे.

Sonu Sood
Jio Phone 5G: मोठमोठ्या कंपन्यांचे धाबे दणाणार! Jio आणणार स्वस्त ५जी स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत-फीचर्स

BMW 7 Series 740Li Individual M Sport Edition चे इंजिन

बीएमडब्ल्यू ७ सीरिजमध्ये कंपनीने पेट्रोल आणि डिझेल असे दोन इंजिन पर्याय दिले आहेत. हे सिलेंडर ३.० लीटर टर्बोचार्ज्ड इंजिन आहे. इंजिन डिझेलवर २६५ पीएस पॉवर आणि ६२० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तर पेट्रोलवर ३४० पीएस पॉवर आणि ४५० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत कंपनीने ई-ड्राइव्ह मोटर जोडली आहे, जी ५८ किमीची ड्राइव्हिंग रेंज प्रदान करते. दोन्ही इंजिन ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतात. यासोबत ऑल व्हील ड्राइव्ह फीचर मिळते.

कंपनीने या प्रीमियम सेडानमध्ये १०.२५ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, अ‍ॅडाप्टिव्ह एअर सस्पेंशन, मागील बाजूसाठी १०.२ इंच फुल एचडी स्क्रीन, १६ स्पीकर हरमन साउंड सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ, पार्किंग असिस्टेंट प्लस सराउंड कॅमेरा, रिव्हर्स असिस्टेंट, ६ एअरबॅग्स, डीएससी आणि सीबीसी सारखे फीचर्स मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com