Cyber crime | व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या अशा लिंक्सवर क्लिक कराल तर होईल पश्चाताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber crime

Cyber crime : व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या अशा लिंक्सवर क्लिक कराल तर होईल पश्चाताप

मुंबई : जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि अशा लोकांपैकी एक असाल जे व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करतात, तर आता तसे करू नका. असे करणे तुमच्यासाठी खूप धोकादायक असू शकते. कारण असे केल्याने तुमच्या खात्यातील पैसेही चोरीला जाऊ शकतात. आजच्या काळात, ऑनलाइन फसवणूक एक अतिशय सामान्य आणि सोपे काम झाले आहे, ज्यामुळे बरेच लोक बळी पडतात.

हेही वाचा: Online dating करताना हे नियम पाळा

नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात एका शिक्षकाच्या खात्यातील २१ लाख रुपये व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील आहे जिथे सोमवारी ही ऑनलाइन फसवणूक झाली.

या शिक्षकाला एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर लिंक मिळाली होती, त्यावर क्लिक केल्यावर त्याच्या खात्यातून २१ लाख रुपये कापले गेले. शिक्षकाने या प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली असून अद्याप तपास सुरू आहे. ऑनलाइन फसवणुकीची ही पहिलीच घटना नसली तरी याआधीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत.

हेही वाचा: Cyber fraud : WhatsAppवरील हे संदेश आहेत फसवे; होईल आर्थिक लूट

तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बाब अत्यंत लक्षवेधी आहे. तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल की जेव्हा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅपवर अशी अनोळखी लिंक येते तेव्हा तुम्ही त्यावर क्लिक करणे टाळावे कारण असे केल्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही अशा ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू शकता.

Web Title: Cyber Crime You Will Regret If You Click On Such Links On Whatsapp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..