Hong Kong Deepfake : खोटा बॉस, खोटे अधिकारी अन् एक व्हिडिओ कॉल.. डीपफेकच्या मदतीने संपूर्ण कंपनीलाच लावला 200 कोटींचा चुना!

Deepfake Scam : स्कॅमरने व्हिडिओ कॉलमध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांना पैसे ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले. हा स्कॅमर कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्याच्या (CFO) रुपात दिसत होता.
Hong Kong CFO Deepfake
Hong Kong CFO DeepfakeeSakal

Hong Kong Company Deepfake Video Conference : डीपफेक तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग चिंतेत असताना हाँगकाँगमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून एका व्यक्तीने मल्टिनॅशनल कंपनीला तब्बल 25.6 मिलियन डॉलर्सचा चुना लावला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊया..

हाँगकाँग पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, स्कॅमरने व्हिडिओ कॉलमध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांना पैसे ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले. हा स्कॅमर कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्याच्या (CFO) रुपात दिसत होता. तो केवळ दिसायलाच खऱ्या अधिकाऱ्याप्रमाणे नव्हता, तर त्याचा आवाजही अगदी सारखाच होता अशी माहिती कंपनीच्या इतर कर्मचारी अन् अधिकाऱ्यांनी दिली. (Deepfake Video Call)

अशा प्रकारची पहिलीच घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीपफेकचा अशा प्रकारे वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने डीपफेक व्हिडिओच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एका संपूर्ण ऑफिसलाच गंडवल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे. (DeepFake Scam)

Hong Kong CFO Deepfake
Taylor Swift Deepfake : पॉप सिंगर टेलर स्विफ्टचा डीपफेक फोटो व्हायरल; अमेरिकेतही होतेय कायदा बनवण्याची मागणी

हाही खोटा.. तोही खोटा..

या स्कॅमचं वैशिष्ट्य म्हणजे, केवळ CFO च नाही, तर व्हिडिओ कॉलमध्ये दिसणारे इतर काही अधिकारी देखील डीपफेकच्या मदतीने तयार केलेले होते. या सर्वांनी कंपनीतील खऱ्या अधिकाऱ्यांना एकूण 15 ट्रान्झॅक्शन करण्याचे आदेश दिले. ही एकूण रक्कम सुमारे 200 कोटी रुपये होती. हे पैसे हाँगकाँगमधील सहा वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये पाठवण्यात आले.

अशी केली फसवणूक..

अधिकाऱ्यांचे डीपफेक रुप तयार करण्यासाठी हॅकर्सनी या अधिकाऱ्यांच्या पब्लिकली उपलब्ध असणाऱ्या माहितीचा वापर केला. व्हिडिओ, फोटो अशा गोष्टींचा वापर करून ते अधिकारी बोलताना त्यांचा आवाज कसा येतो, त्यांचे हावभाव कसे असतात या सगळ्याची माहिती हॅकर्सना सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून मिळाली. (CFO Deepfake Call)

Hong Kong CFO Deepfake
Explained : रश्मिकाच्या व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आलं 'Deepfake', काय आहे ही टेक्नॉलॉजी ज्याची बायडेन यांनाही भीती?

आधी ई-मेल नंतर व्हिडिओ कॉल

या कंपनीचं नाव हाँगकाँग पोलिसांनी उघड केलेलं नाही. ही मल्टिनॅशनल कंपनी असून, कंपनीचे सीएफओ यूकेमध्ये होते. यावेळी त्यांच्या नावाने एक ई-मेल कंपनीमध्ये आला होता. हा मेल खोटा असल्याचा संशय एका कर्मचाऱ्याला आल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर स्कॅमर्सने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मदत घेतली. यामध्ये कित्येक ओळखीचे चेहरे पाहिल्यामुळे कर्मचाऱ्यांची खात्री पटली की हा व्हिडिओ कॉल खरा आहे.

Hong Kong CFO Deepfake
Types of Deepfake : एकच नाही, तर डीपफेकचे आहेत विविध प्रकार! जाणून घ्या कसे ओळखायचे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com