AIIMS Cyber Attack : एम्स हॅकिंगची Inside Story अन् उपस्थित झालेले प्रश्न

एम्सच्या हॅकिंगमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Cyber Attack
Cyber AttackSakal

AIIMS Data Hacking : इंटरनेटच्या वाढत्या वेगाने अनेक कामे अगदी सहज होऊ लागली आहे. मात्र, वाढत्या इंटरनेटमुळे अनेक आव्हानेही उपस्थित झाली आहे. त्यात नुकताच दिल्लीतील एम्स रूग्णालयाचा डाटा हॅक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सायबर सिक्युरिटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हॅकिंगमुळे गेल्या एक आठवड्यापासून एम्समधील सेवांवर याचा परिणाम झाला आहे.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

Cyber Attack
Maharashtra-Karnataka Issue : भारतात असूनही कर्नाटकचा वेगळा झेंडा? जाणून घ्या नेमकं प्रकरण

एम्सच्या हॅकिंगनंतर तपास यंत्रणा तपासात गुंतल्या असून, एम्सच्या हॅकिंगमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. डाटा हॅकिंगनंतर हॅकर्सने एम्सकडे २०० कोटींची खंडणीची मागणी केल्याचेही सांगितले आहे. ही खंडणी हॅकर्सने क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात मागितली आहे. मात्र, पोलीस आणि एम्सच्या अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही मागणी फेटाळून लावली आहे.

Cyber Attack
AIIMS Cyber Attack: एम्सवर सायबर हल्ला; हॅकर्सने मागितले २०० कोटी, माजी पंतप्रधानांसह ४ कोटी रुग्णांचा हेल्थ डेटा धोक्यात

सायबर जग आणि हॅकिंग

सायबर जग आपल्यासाठी अनेक गोष्टी सुलभ करते. येथे तुम्हाला रेकॉर्ड ठेवण्यासाठी मोठ्या कागदी फाईल्स तयार करण्याची गरज नसते. हा सर्व डेटा डिजीटल स्वरूपात उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एस्ममध्ये देशातील अनेक व्हिआयपी व्यक्तींच्या आरोग्यासंबंधी माहिती आहे. हॅकर्सने एम्समध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीने हॅकिंग केले हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

सर्व्हर डाउन म्हणजे काय?

जेव्हा सर्व्हर डाउन असतो तेव्हा होस्ट सर्व्हरवर इंटरनेटद्वारे प्रवेश केला जाऊ शकत नाही, तेव्हा त्याला सर्व्हर डाउन असल्याचे म्हटले जाते. ज्यावेळी एखादी साईटची युआरएल टाकता आणि ती ओपन होत नाही त्याला सर्व्हर डाऊन आहे असे म्हणतात. सर्व्हर डाऊन होण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये नेटवर्क आउटेज म्हणजे नेटवर्क नसणे, ह्युमन एरर, हार्डवेअर इश्यू, सॉफ्टवेअरसंबंधित समस्या आदींचा समावेश असू शकतो.

Cyber Attack
AIIMS Crisis : दिल्लीतील एम्स रुग्णालयात सायबर हल्ला; दोघांना केले निलंबित

रॅन्समवेअर म्हणजे काय?

एम्स हॅकिंग प्रकरणात हॅकर्सने २०० कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सीची मागणी केली आहे. मात्र, अशी कोणतीही मागणी केल्याचे वृत्त एम्सच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहे. जर, अशा पद्धतीने हॅकर्सने मागणी केली असेल तर, याला रॅन्समवेअर असे म्हटले जाते. रॅम्पवेअरला सॉफ्टवेअर-आधारित टूल असेदेखील संबोधले जाते. यामध्ये एखाद्या संस्थेचा किंवा व्यक्तीचा डेटा मिळविण्यासाठी आणि त्याबदल्यात खंडणीची मागणी करण्यासाठी याची डिझाइन केलेली असते. यामध्ये हॅकर्स एखाद्या संस्थेचा डेटा एन्क्रिप्ट करून ब्लॉक करतात आणि संबंधित संस्थेकडून पैशांची मागणी करतात. जोपर्यंत पैशांची पूर्तता होत नाही. तोपर्यंत संबंधित संस्थेला सर्व्हर किंवा डेटामध्ये प्रवेश करण्यास परवानगी देत नाही.

Cyber Attack
WhatsApp: तब्बल ५० कोटी व्हॉट्सअ‍ॅप नंबरची सुरू आहे ऑनलाइन विक्री, हॅकर्स ग्राहकांच्या शोधात

हॅकर्सने क्रिप्टोकरन्सीमध्येच का केली पैशांची मागणी?

एम्स प्रकरणात हॅकर्सने क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात पैशांची मागणी केली आहे. यापूर्वीदेखील अनेक प्रकरणांमध्ये हॅकर्सने क्रिप्टोकरन्सीच्या रूपातच पैशांची मागणी केली आहे. क्रिप्टोकरन्सीचे पैसे कोणाला दिले गेले याचा शोध घेणे अशक्य आहे. त्यामुळे हॅकर्स स्वतःची ओळख लपवण्यासाठी क्रिप्टोच्या स्वरूपात पैशांची मागणी करतात. हे पैसे घेण्यासाठी केवळ क्रिप्टो वॉलेट सांगावे लागते. यामध्ये कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती उघड होत नाही. क्रिप्टोकरन्सी एका वॉलेटमधून दुसऱ्या वॉलेटमध्ये सहजपणे हस्तांतरित केली जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com