Ford Mustang Price : दिल्लीतील 'वडापाव गर्ल' चालवते त्या फोर्ड मस्टँग कारची किंमत किती? वाचून व्हाल थक्क

Delhi Vada Pav Girl : एका व्हायरल व्हिडिओमध्ये चंद्रिका एक कार चालवताना दिसत आहे. ही साधीसुधी कार नसून, फोर्ड कंपनीची मस्टँग गाडी आहे.
Ford Mustang Price
Ford Mustang PriceeSakal

Vada Pav Girl Mustang Car Price : सध्या देशात सगळीकडे जणू केवळ दोनच गोष्टींची चर्चा आहे. एक म्हणजे निवडणूक आणि दुसरी दिल्लीतील वडापाव गर्ल. दिल्लीतील रस्त्यावर वडापावची गाडी चालवणारी चंद्रिका दीक्षित ही तरुणी रोज वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. सध्या तिचा एका कारमधील व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये चंद्रिका एक कार चालवताना दिसत आहे. ही साधीसुधी कार नसून, फोर्ड कंपनीची मस्टँग गाडी आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की चंद्रिका ही कार चालवत येते, आणि कारच्या डिक्कीमधून वडापाव काढून त्याची विक्री सुरू करते. चंद्रिकाने आपल्या अधिकृत इन्स्टा अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

किती आहे किंमत?

फोर्ड मस्टँग ही एक महागडी आणि दमदार कार आहे. कित्येक कार लव्हर्सचं स्वप्न असणारी ही कार भारतात सुमारे 75 लाख रुपयांना उपलब्ध आहे. या कारमध्ये 5.0 लीटरचं Ti-VCT इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये इलेक्ट्रिक पॉवर असिस्टेड स्टिअरिंग फीचर देखील मिळते.

Ford Mustang Price
Viral Vada Pav Girl: हाणामारी, शिव्या अन् धमक्या; व्हायरल वडापाव गर्लचं रस्त्यावर जोरदार भांडण,पाहा व्हिडीओ

चंद्रिकाने या व्हिडिओमध्ये हेही सांगितलं आहे की ती गाडी तिची आहे. एवढंच नाही, तर या गाडीतून बाहेर पडून ती थेट आयफोन खरेदी करायला जात असल्याचंही दिसत आहे. तिने नवीन आयफोन, अ‍ॅपल वॉच आणि एअर पॉड्स देखील विकत घेतले. यासोबतच तिने लवकरच काहीतरी मोठी गोष्ट होणार असल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे, आता ती काय करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com