Fraud Risk Indicator : डिजिटल व्यवहारात नवा वॉचडॉग! FRI यंत्रणा झाली सुरू; तुमचा नंबर 'हाय रिस्क' आहे का? जाणून घ्या

Financial Fraud Risk Indicator Department of Telecommunications : डॉट विभागाने सायबर फसवणूक थांबवण्यासाठी ‘FRI’ नावाची विशेष यंत्रणा सुरू केली आहे.
Financial Fraud Risk Indicator Department of Telecommunications
Financial Fraud Risk Indicator Department of Telecommunicationsesakal
Updated on

Financial Fraud Risk Indicator : युपीआय आणि डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications - DoT) आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी 'फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर' (Financial Fraud Risk Indicator - FRI) ही नवी यंत्रणा सुरू केली आहे. ही यंत्रणा फसवणुकीशी संबंधित असलेल्या मोबाइल क्रमांकांचा मागोवा घेऊन बँका, युपीआय सेवा प्रदाते व इतर वित्तीय संस्थांना सतर्क करते.

काय आहे ‘FRI’?

FRI ही एक अत्याधुनिक डिजिटल विश्लेषण प्रणाली आहे, जी सायबर फसवणुकीचा धोका असलेल्या मोबाइल क्रमांकांची ओळख पटवते. हे क्रमांक 'मध्यम', 'उच्च' किंवा 'खूप उच्च' अशा तीन गटांमध्ये वर्गीकृत केले जातात. ही माहिती विविध स्त्रोतांद्वारे मिळते जसे की इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C), DOT ची 'चक्षु' यंत्रणा, तसेच बँका आणि वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या गुप्तचर अहवालांवर आधारित असते.

व्यवहार थांबवण्याचा निर्णय

जर एखादा मोबाइल क्रमांक खूप उच्च जोखमीचा (Very High Risk) म्हणून वर्गीकृत असेल, तर त्या क्रमांकावरून युपीआय किंवा अन्य डिजिटल व्यवहार त्वरित थांबवले जातील. बँका आणि सेवा प्रदाते अशा वापरकर्त्यांना अॅलर्ट देऊन त्यांच्या खात्यांची अधिक तपासणी करतील. यामुळे सामान्य ग्राहकांना सुरक्षिततेचा मोठा दिलासा मिळणार आहे.

Financial Fraud Risk Indicator Department of Telecommunications
Moto G85 5G Discount Offer : धमाका ऑफर! 18 हजारचा Moto G85 5G मोबाईल मिळतोय फक्त 10 हजारांत, कुठे खरेदी कराल? पाहा एका क्लिकवर

'डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म'ची साथ

FRI ही प्रणाली डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (DIP) अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्ममार्फत DOT ने विविध भागधारकांना बँका, NBFC, UPI प्रदाते यांना सतत माहिती पुरवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मोबाईल नंबर रिव्होकेशन लिस्ट (MNRL) देखील सामील आहे, जिथे फसवणुकीसाठी वापरले गेलेले किंवा पुन: पडताळणी अयशस्वी झाल्याने बंद करण्यात आलेले मोबाइल क्रमांक नमूद असतात.

DOT च्या म्हणण्यानुसार, सायबर फसवणुकीसाठी वापरले जाणारे मोबाइल क्रमांक फार कमी दिवस सक्रिय राहतात. त्यामुळे त्यावर लवकर कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. FRI च्या माध्यमातून संशयित क्रमांक त्वरित स्कॅन केले जातात आणि त्यांची जोखीम पातळी ठरवून संबंधित यंत्रणांना तात्काळ कळवली जाते.

Financial Fraud Risk Indicator Department of Telecommunications
Cyber Security : ऑनलाइन फसवणुकीची भीती आहे? सरकारने सुरू केली "स्कॅम-प्रूफ" वेबसाईट, तुमचे सर्व अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर

PhonePe कडून सुरुवातीला वापर

डिजिटल पेमेंट सेवा देणारी PhonePe ही पहिली कंपनी ठरली आहे, जिने FRI यंत्रणेचा प्रत्यक्ष वापर सुरू केला आहे. Very High Risk म्हणून वर्गीकृत क्रमांकांवरून येणारे व्यवहार PhonePe Protect तंत्रज्ञानाच्या मदतीने थांबवले जातात. इतकेच नव्हे तर मध्यम जोखमीच्या क्रमांकांसाठीही वापरकर्त्यांना व्यवहारापूर्वी सतर्कतेचा इशारा दिला जातो.

ग्राहकांनी काय करावं?

  • आपल्या मोबाइल क्रमांकाची KYC नेहमी अपडेट ठेवावी.

  • अनोळखी लिंक किंवा OTP शेअर करू नये.

  • व्यवहार करताना अॅप्सकडून दिलेले इशारे गांभीर्याने घ्यावेत.

ही नवी यंत्रणा केवळ व्यवहार थांबवण्यापुरती मर्यादित नसून, देशात वाढत चाललेल्या सायबर फसवणुकीच्या घटनांना थोपवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि विश्वासार्ह डिजिटल व्यवहारासाठी ही एक महत्वाची यंत्रणा असल्याचं मानलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com