
Online Rummy : आठवतेय, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरातले सगळेजण कसे एकत्र होऊन पत्त्याचा डाव मांडून बसायचे? पत्त्यांचे ते पारंपरिक खेळ अजूनही नाहीसे झालेले नाही – उलट ते नवे रूप घेत आहेत! रम्मी या आपल्यातल्या अनेकांना आजोबांनी शिकवलेल्या क्लासिक खेळालाही ऑनलाइन जगामध्ये नवा जन्म मिळाला आहे, आणि आपल्या डावपेचांच्या साऱ्या हुशारीसह हा खेळ आता आपल्या हाताच्या बोटांशी आला आहे. एकेकाळी या खेळासाठी साथी मिळविण्यासाठी कुटुंबातल्या निरुत्साही सदस्यांना राजी करत बसावे लागायचे, आता मात्र ते दिवस सरले आहेत. आजच्या काळातील डिजिटल प्लॅटफॉर्म्स देशभरातील रम्मी प्रेमींना एकत्र आणत आहेत, आणि त्यात खरीखुरी बक्षिसे जिंकण्याच्या गोड शक्यतेचीही भर पडली आहे. जुन्या आठवणी, डावपेच आणि बक्षिसे मिळण्याची संभाव्यता हीच कारणे आहेत, ज्यामुळे लक्षावधी लोकांना कधी जुन्या न होणाऱ्या या खेळासाठीचे आपले प्रेम नव्याने सापडत आहे.