Reliance Jio च्या या 2 रिचार्जसोबत प्रीमियम चित्रपट अन् टिव्ही शोची मेजवानी | Disney+Hotstar Premium Subscription | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Reliance Jio
Reliance Jio च्या या 2 रिचार्जसोबत प्रीमियम चित्रपट अन् टिव्ही शोची मेजवानी | Disney+Hotstar Premium Subscription

Reliance Jio च्या या 2 रिचार्जसोबत प्रीमियम चित्रपट अन् टिव्ही शोची मेजवानी

Reliance Jio Recharge Plan: रिलायन्स जिओ यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन बंडल्स प्रीपेड योजना जाहीर केली आहे. रिलायन्स जिओचे हे नवीन प्लॅन 1,499 रुपये आणि 4,199 रुपयांचे आहेत. हे रिचार्ज प्लॅन डिस्ने + हॉटस्टार प्रीमियम (Disney+Hotstar Premium) सबस्क्रिप्शनसह येतात. या प्लॅनमध्ये जिओ वापरकर्ते त्यांच्या नंबरवर डिस्ने + हॉटस्टारच्या सर्वात खास अशा डिस्ने + हॉटस्टार प्रीमियमचा आनंद घेऊ शकतील. डिस्ने + हॉटस्टारचं प्रीमियम सदस्यतेच्या माध्यमातून युजर्सना आवडीचा कंटेंट 4K मध्ये एकाच वेळी 4 डिव्हाइसवर पाहू शकतील. ही सेवा मोबाईल, लॅपटॉप, टॅब्लेट आणि कनेक्टेड टीव्हीमध्ये वापरली जाऊ शकते. (Disney+Hotstar Premium subscription with Reliance Gio recharge)

हेही वाचा: Jio ची ‘ती’ चूक दुरुस्त, GMRT चा अडथळा दूर; पाहा व्हिडीओ

168 GB डेटा आणि 1 वर्षाची Disney+ Hotstar प्रीमियम सदस्यता-

रिलायन्स जिओच्या 1,499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार प्रीमियम सबस्क्रिप्शन पूर्ण वर्षासाठी उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 2GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 168GB डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच, दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मोफत दिले जाते.

1095 GB डेटा आणि 1 वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टार प्रीमियम सब्सक्रिप्शन-

रिलायन्स जिओचा 4,199 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या म्हणजेच 1 वर्षाच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 1095GB डेटा उपलब्ध आहे. डिस्ने + हॉटस्टार प्रीमियम सबस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये एका वर्षासाठी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगच्या फायद्यासह दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्लॅनमध्ये Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मोफत उपलब्ध आहे.

हेही वाचा: Jio देणार सर्वांना परवडणारी उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा

डिस्ने + हॉटस्टार प्रीमियम सबस्क्रिप्शन कसे सक्रिय करावे?-

1. तुम्ही रु. 1,499 किंवा रु 4,199 चा प्लॅन रिचार्ज करताच, तुम्हाला My Jio खात्यामध्ये एक डिस्ने + हॉटस्टार प्रीमियम कूपन कोड मिळेल.

2. तुम्ही हा कूपन कोड 1 वर्षाचे डिस्ने + हॉटस्टार प्रीमियम सदस्यत्व मिळवण्यासाठी वापरू शकता.

3. डिस्ने + हॉटस्टार प्रीमियमचे सदस्यत्व सक्रिय करण्यासाठी, प्रथम https://www.hotstar.com/in/subscribe/promo वर जा.

4. तुमच्या Jio नंबरने साइन इन करा आणि OTP टाका.

5. तुम्हाला प्राप्त झालेला युनिक कूपन कोड एंटर करा आणि तुमचे सबस्क्रिप्शन पुष्टीकरणानंतर सक्रिय केले जाईल.

Web Title: Disneyhotstar Premium Subscription With Reliance Gio Recharge

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..