ICC World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्डकप पाहण्याची मजा होणार पाचपट! डिज्नी+हॉटस्टारने लाँच केले पाच नवे फीचर्स

Disney+Hotstar : डिज्नी+हॉटस्टार अ‍ॅपवर या विश्वचषकातील सामने मोफत पाहता येणार आहेत.
ICC World Cup 2023
ICC World Cup 2023eSakal

आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप आजपासून सुरू झाला आहे. डिज्नी+हॉटस्टार अ‍ॅपवर या विश्वचषकातील सामने मोफत पाहता येणार आहेत. यूजर्सना अधिक चांगल्या प्रकारे हे सामने पाहता यावेत यासाठी कंपनीने काही नवीन फीचर्स लाँच केले आहेत.

Disney+Hotstar ने आपले लाईव्ह फीड आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग फीचर अपग्रेड केले आङेत. यामध्ये एआय-बेस्ड व्हिडिओ क्लॅरिटी सुधारणा करण्यात आल्या आहेत. कंपनीने एक नवीन 'मॅक्स व्ह्यू' हे फीचरही लाँच केलं आहे. यूजर्सना याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे.

ICC World Cup 2023
ICC World Cup 2023: वर्ल्ड कपच्या जाहिरातींवर किती कोटींची होणार उधळण? सर्वाधिक वाटा कोणत्या कंपन्यांचा?

मॅक्स व्ह्यू

कंपनीने आयसीसीसोबत मिळून MaxView हे फीचर लाँच केलं आहे. या फीचरमुळे यूजर्सना पोर्ट्रेट मोड, म्हणजेच व्हर्टिकल व्ह्यूमध्ये सामने पाहता येणार आहेत. सामन्याचं लाईव्ह फीड, स्कोअरकार्ड आणि जाहिराती देखील व्हर्टिकल असणार आहेत. म्हणजेच आता यूजर्सना सामने पाहण्यासाठी आपला फोन आडवा करण्याची गरज भासणार नाही.

कमी डेटाचा वापर

डिज्नी+हॉटस्टारने आपली व्हिडिओ डिलिव्हरी ऑप्टिमाईज केली आहे. यामुळे हाय-क्वालिटी व्हिडिओ स्ट्रीमिंगचा अनुभव यूजर्सना येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी अगदी कमी डेटाचा वापर होणार आहे. त्यामुळे यूजर्स कोणत्याही अडथळ्याशिवाय संपूर्ण सामना स्ट्रीम करू शकणार आहेत.

ICC World Cup 2023
Disney+ Hotstar : नेटफ्लिक्सनंतर आता डिज्नी+हॉटस्टारचाही यूजर्सना दणका! पासवर्ड शेअरिंग केलं बंद

क्रिकेट स्कोअरकार्ड

दुसरं एखादं काम करत असतानाही मॅचच्या स्कोअरवर लक्ष ठेवणं आता सोपं होणार आहे. डिज्नी+हॉटस्टारने अलवेज-ऑन क्रिकेट स्कोअरकार्ड पिल हे फीचर लाँच केलं आहे. ही फ्लोटिंग टॅब तुम्हाला स्क्रीनवर छोट्या बॉक्समध्ये स्कोअर दाखवत राहील.

लाईव्ह फीड टॅब

या टॅबमध्ये यूजर्सना सामन्यात काय सुरू आहे याची कमेंट्री वाचायला मिळणार आहे. प्लेयर स्टेटस, मॅच अपडेट्स अशा गोष्टींची माहिती यामध्ये मिळणार आहे.

कमिंग सून

डिज्नी+हॉटस्टारने एक 'कमिंग सून' टॅबही लाँच केला आहे. यामध्ये यूजर्सना पुढील मॅचसाठी रिमाईंडर देखील लावता येणार आहे. सोबतच, फ्री आणि पेड कंटेंट हे वेगवेगळ्या ट्रेमध्ये असणार आहेत, ज्यामुळे फ्री यूजर्सना अधिक सोप्या पद्धतीने कंटेंट डिलिव्हरी होणार आहे.

ICC World Cup 2023
ICC World Cup 2023: वर्ल्डकपमधून डिस्ने स्टार कमावणार जबरदस्त नफा, 'इतक्या' कोटींची होणार कमाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com