
नागपूर : ट्विटरच्या साहायाने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात. तसेच संवाद साधता येतो. या मजकुराला ट्विट म्हणतात. ट्वीट्स ही २८० (पूर्वी १४०) अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. आजघडीला ट्विटर सर्वाधिक पसंतीचे झाले आहे. ट्विटरवर मोठ-मोठ्या लोकांनी आपले खाते उघडले आहेत. फॉलोअर्सवरून प्रसिद्ध ठरत असते. ही सर्वाधिक लोकप्रिय व पसंत केले जाणारे माध्यम झाले आहे.
ट्विटर हे सार्वजनिक संभाषणाचे ठिकाण आहे जे जगात काय घडत आहे याची माहिती देते आणि लोकांना संवाद साधण्यास मदत करते. ट्विटर सेवेतील विविधतेस प्रोत्साहित करून लोकांना पसंतीच्या भारतीय (भारतीय) भाषेत व्यक्त करण्याची परवानगी देतो. मात्र, काही लोकांना इंग्रजीची अडचण येत असल्याने मोठा त्रास होतो. तेव्हा आज आपण ट्विटरवर भाषा कशी बदलायची हे पाहूया...
सर्वांत अगोदर वेबद्वारे ट्विटर खात्यावर साइन इन (Sign in) करा. यानंतर मेनू चिन्हावर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून सेटिंग्ज आणि गोपनीयता (Settings and privacy) निवडा. आता खाते सेटिंग्ज विभागात (Accounts settings) डेटा आणि परवानग्यांमधील (Data and Permissions) भाषा प्रदर्शित करा पर्याय निवडा. त्यानंतर भाषा (Language) ड्रॉप-डाऊन मेनूमधून आपली भाषा निवडा आणि सेव्ह वर क्लिक करा.
Android किंवा iOS अॅपवर मेनू चिन्हावर क्लिक करा आणि ड्रॉप-डाऊन मेनूमधून सेटिंग्ज आणि गोपनीयता (Settings and privacy) निवडा. ड्रॉप-डाऊन सूचीमधून (Content Preferences) सामग्री प्राधान्यांमधून (ecommendations) दुरुस्ती निवडा. आता आपण निवडू इच्छित भाषेचा बॉक्स निवडा. आपल्या पसंतीच्या अनेक भाषा त्यांच्याकडे दिलेल्या बॉक्सवर क्लिक करून निवडू शकता. एकदा निवडल्यानंतर सेव्ह क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.