Double Your Phone Battery : नवीन फोन घेऊनही बॅटरी लवकर उतरते? फॉलो करा 'या' टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Double Your Phone Battery

Double Your Phone Battery : नवीन फोन घेऊनही बॅटरी लवकर उतरते? फॉलो करा 'या' टिप्स

How To Double Your Phone Battery : नवीन फोन घेतलाय, भरपूर मेमरी, रॅम आणि लेटेस्ट फिचर्स बघून. 6000mAh चा फोन घेऊनही संध्याकाळपर्यंत फोन डिस्चार्ज होतो? लाँगस्टिंग फीचर बघून फोन घेतला पण तरीही फोन लवकर डिसर्चाज झाल्याने आपण वैतागतो. पण असं का होतं माहितीये?

बॅटरी लवकर लो होण्यामागे काय कारण असेल, डिस्प्ले, जीपीएस, लोकेशन, इंटरनेट? तर याच उत्तर नाही असं आहे. बॅटरी लवकर ड्रेन होण्याचं मुख्य कारण आहे तुमच्या फोनमधले अ‍ॅप्स.

  • असे बरेच अ‍ॅप्स तुम्ही फोनमध्ये डाऊनलोड करून ठेवलेले आहेत.

  • ते तुम्ही वारत नसलात तरी बॅग्राउंडला रन करत राहतात.

  • डेटा सेव्ह करत असतात.

  • जीपीएस, इंटरनेट, काँटॅक्ट्स वापरत आहेत. असं बरच काही सतत सुरू असतं.

  • असे काही अ‍ॅप्स आहेत, ज्यांचा अभ्यास केल्यावर समजलं की, ते किती वापरले जातात आणि किती बॅटरी कंझ्युम करतात?

असे कोणते अ‍ॅप्स आहेत?

  1. जाहिरातींचे कोइंटी अ‍ॅप ते सतत रन करत राहतात आणि बॅटरी कंझ्युम करतात.

  2. स्मार्ट वॉचशी कनेक्ट करणारं अ‍ॅप. त्यात अ‍ॅप वारात असेल तेंव्हाच सुरू करण्याचे ऑप्शन सिलेक्ट करा.

  3. ओला उबर सारखे अ‍ॅप फार बॅटरी घेतात. कारण ते सतत तुमचं लोकेशन ट्रॅक करत असतं, जेणे करून तुम्हाला लगेच सेवा देतील.

  4. गुगल क्रोम, फेसबुक यामुळे बॅटरी लवकर उतरते. यांचा वापर झाला की, पेज बंद करून ठेवा. ओपन ठेऊ नका. त्यामुळे बॅटरी जास्त वापरली जाते.

  5. त्यामुळे जे अ‍ॅप तुम्हाला लागत नाहीत ते अनइंस्टॉल करा आणि बॅटरीचं लाइफ वाढवा.

टॅग्स :mobileMobile AppBattery