esakal | Ducati माँस्टर बाईक भारतीय बाजारात दाखल, जाणून घ्या फिचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

डकाटी माँस्टर बाईक

Ducati माँस्टर बाईक भारतीय बाजारात दाखल, जाणून घ्या फिचर्स

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - जागतिक स्पोर्ट बाईक कंपनी डकाटीने (Ducati Monster)नवीन डकाटी माँस्टर आणि डकाटी माँस्टर प्लस या दोन बाईक्स भारतीय बाजारात सादर केले आहे. रेसिंग बाईकच्या शौकिनांसाठी ही मोटारसायकल खूपच विशेष आहे. जाणून घ्या तिची किंमत आणि इतर फिचर्सविषयी...

- डकाटीच्या दाव्यानुसार तिची या नवीन डकाटी माँस्टर आणि डकाटी माँस्टर प्लस खूपच हलके आणि काॅम्पॅक्ट आहे. या बाईकचे वजन केवळ १६६ किलोग्रॅम आहे. कंपनी म्हणते की तिची चेसिस जुन्या माँस्टरपेक्षा ६० टक्क्यांपर्यंत हलकी आहे.

- डकाटी माँस्टरमध्ये कंपनीने नवीन दमदार इंजिन दिले आहे. त्यात ९३७ सीसीचे टेस्टास्ट्रेटा ११' L-twin इंजिन आहे. हे जुन्या ८२१ इंजिनपेक्षा जवळपास दीड किलोग्रॅमने हलके आहे. दुसरीकडे पाॅवरच्या बाबतीत ती १११ hpच्या कमाल पाॅवर आणि ९३ Nmच्या पीक टाॅर्क निर्माण करते. त्यात ३ रायडिंग मोड स्पोर्ट, टुरिंग आणि अर्बन मिळते.

- डकाटी माँस्टर दिसायला रफ अँड टफ आहे. यात नवीन चेसिस सेटअप दिला आहे. फ्रंट फ्रेम Panigale V 4 पासून घेतले आहे. ते अॅल्युमिनिअमपासून बनवलेले छोटे फ्रेम आहे. तिचे व्हिलबेसही छोटे ठेवण्यात आले आहे. त्यात १७ इंचाचे एलाॅय व्हिल देण्यात आले आहे. त्यात फ्रंटवर एलइडी डीआरएल हँडलॅम्प आहे. तिचा मागचा भाग खूप पातळ ठेवण्यात आला आहे.

- डकाटी माँस्टरची सीटची उंची ८२० मीमी इतकी आहे. पुढे अरुंद आणि मागे रुंद आहे. यामुळे बाईक चालवणाऱ्याला एअरो डायनामिक्स मिळते व तो जमिनीवर सहज पाय ठेवू शकतो.

डकाटी माँस्टर प्लस बाईक

डकाटी माँस्टर प्लस बाईक

- डकाटी माँस्टरमध्ये ४३ मीमीचे फ्रंट फोर्क सस्पेंशन सिस्टम आहे. दुसरीकडे या मोटारसायकलच्या बेक्रिंग सिस्टमही अद्ययावत करण्यात आले आहे. मागच्या चाकावर ब्रेम्बो कॅलिपर्सची पकड सिंगल २४५ मीमी डिस्कवर राहत आहे.

- डकाटी माँस्टरमध्ये ४.३ इंचचा कलर टीएफटी डिस्प्ले आहे. त्यामुळे गिअर पोझिशन, हवेचे तापमान आणि इंधनाची पातळी आदींची माहिती कळते. यात डकेटी मल्टिमीडिया सिस्टमही आहे. जे बटणाच्या मदतीने हँडलबारने नियंत्रण केले जात आहे.

- कंपनीने डकाटी माँस्टर आणि डकाटी माँस्टर प्लसला डकेटी रेड, डार्क स्टिलथ आणि अॅव्हिएटर ग्रेमध्ये लाँच केले आहे. तिची सुरवातीची एक्स शोरुम किंमत १०.९९ लाख रुपयांपासून सुरु होते. वेगवेगळे काॅम्बिनेशन आणि कलर मॅचिंगसह तिची जास्तीत-जास्त किंमत ११.३४ लाख रुपये आहे.

loading image
go to top