उपवासामुळे वाढते आयुर्मान

वृत्तसंस्था
शनिवार, 10 डिसेंबर 2016

आपल्या देशात उपवासाला महत्त्व आहे. त्यामागे धार्मिक कारणे असली, तरी महिना किंवा पंधरा दिवसांच्या फरकाने केलेल्या उपवासामुळे आयुष्यमान वाढत असल्याचा दावा बोस्टनमधील हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एका संशोधनाद्वारा केला आहे. संशोधन करणाऱ्या गटाचा प्रमुख मायकेल ग्ल्यू म्हणाला,""उपवासाचा शरीरावर
काय परिणाम होतो, हा आमच्या अभ्यासाचा विषय होता. त्यासाठी आम्ही 24नागरिक निवडले होते. त्यांच्या भोजनाच्या सवयींचा तीन आठवडे अभ्यास करून आहाराचे सुसूत्रीकरण

करण्यात आले. त्यांना रोजच्या भोजनासाठी काहीही प्रतिबंध केला नाही. महिन्यातून एकदा किंवा दोनदा त्यांना पूर्ण उपवास करायला सांगितला. काही महिन्यांनंतर"एसआयआरटी'या प्रथिनामध्ये वाढ होऊन शरीरातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण कमी झाल्याचे लक्षात आले. मधुमेह असणाऱ्यांसाठी या पद्धतीचे"डाएट'उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले.
साहजिकच त्यांचे आयुष्यमान वाढेल, अशी आम्हाला खात्री झाली आहे. सुरवातीला उपवास आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करण्यास अडचण निर्माण झाली. मात्र उपवास केलेल्या दिवशी अधिक फ्रेश वाटल्याचे सहभागींनी सांगितले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the fast increase in life expectancy