Battery Swapping : ई-दुचाकींच्या चार्जिंगचा प्रश्न आता सुटणार

मुंबईत बॅटरी स्वॅपिंग अधिक सुलभ करण्यासाठी ‘व्होल्टअप’ची अदानी इलेक्ट्रिसिटी, हिरो इलेक्ट्रिक आणि झोमॅटोसह भागीदारी
Battery Swapping
Battery Swappingesakal

हायलाइट्स

  • गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान १० ठिकाणी १२० डॉक्सची सुविधा

  • वर्षाअखेरीस शहरात आणखी ५० ठिकाण जोडली जाणार

  • दोन वर्षात मुंबईत दररोज ३०,००० हून अधिक दुचाकीस्वारांची पूर्तता करू शकणारी ५०० बॅटरी स्वॅपिंग ठिकाणांचे उद्दिष्ट

E-Bike - प्रदूषण कमी करण्यासाठी ई-बाईकचा प्रस्ताव सरकार कडून मांडला गेला. त्याला जनतेनेही सकारात्मकपणे घेतले. पण ई-बाईक घेतल्यावरही त्याच्या चार्जिंगचे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध्द नसल्याने एवढे महागाचे वाहन घेऊन करायचे काय, असा प्रश्न पडतो. यावर मुंबईच्या बॅटरी स्वॅपिंग स्टार्ट-अप उपक्रम ‘व्होल्टअप’ने अदानी इलेक्ट्रिसिटी, हिरो इलेक्ट्रिक आणि झोमॅटो यांच्याशी भागीदारी जाहीर केली आहे.

काय असते बॅटरी स्वॅपिंग?

ई-दुचाकींच्या बॅटरीची अदलाबदल म्हणजे बॅटरी स्वॅपिंग

ई-बाईकपुढचे आव्हाने

चार्जिंग पायाभूत सुविधांचा अभाव, तशा सुविधा बाळगण्याची उच्च किंमत आणि विद्युत (इलेक्ट्रिक) वाहनांसाठी लागणारा दीर्घ चार्जिंग वेळ

काय होणार फायदा

  • चर्चगेट ते मीरा-भाईंदर या पश्चिम मार्गावर वर्षाअखेरीस आणखी ५० स्थानांची भर घालणार आहे.

  • गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान १० ठिकाणी १२० कठड्यांसह (डॉक्स) सुरू होणार.

  • २०२४ पर्यंत मुंबईभर अशा ५०० बॅटरी स्वॅपिंग केंद्रे कार्यान्वित करण्याचा विचार

  • दररोज ३०,००० हून अधिक दुचाकीस्वारांना सेवा पुरविली जाईल.

  • झटपट बॅटरी अदलाबदल केल्याने डिलिव्हरी रायडर्सना सतत बॅटरी चार्ज करण्यासाठी थांबावे लागणार नाही.

  • जीवाश्म इंधनाला पर्यायी स्वच्छ इंधन वापरून त्यांचा वाहनचालनाचा खर्चही ३ रुपये प्रति किमीवरून कमी होऊन १ रुपया प्रति किमी होईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com