सकाळचा नाश्ता ठरतो दिवसाचा हेल्दी स्टार्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

टाइप 2 मधुमेह रुग्णांमध्ये लठ्ठपणा कॉमन असतो. जे टाइप 2 मधुमेह रुग्ण नाश्ता उशीरा करतात त्यांच्यासाठी बॉडी मास इंडेक्स वाढण्याचा धोका असतो.

सकाळचा नाश्ता म्हणजे आपल्या रोजच्या आहारातला दिवसाचा परफेक्ट आणि हेल्दी स्टार्ट म्हणता येईल. विशेषतः जे टाइप 2 मधुमेह रुग्ण नाश्ता उशीरा करतात त्यांच्यासाठी बॉडी मास इंडेक्स वाढण्याचा धोका असतो. शिकागो येथील इलिनॉइस विद्यापिठाने केलेल्या अभ्यासानुसार, रात्री उशीरापर्यंत जागणे आणि नाश्ताची वेळ उशीरापर्यंत लांबविणे टाइप 2 मधुमेह रुग्णांचे बॉडी मास इंडेक्स वाढविते. 

टाइप 2 मधुमेह रुग्णांमध्ये लठ्ठपणा कॉमन असतो. उशीरा उठणे आणि उशीरा झोपणे या सवयी लठ्ठपणा वाढविण्यास कारणीभूत ठरतात. परंतू या संबंधी संशोधनाची कमी आहे. रिसर्चर सिरीमन रेउट्राकुल यांच्या नेतृत्त्वाखाली रिसर्चर्सच्या एका टिमने टाइप 2 मधुमेह असलेल्या थायलंडमधील 210 नॉन शिफ्ट वर्कसला निवडले. त्यांच्यासाठी एक प्रश्नावली तयार केली. ज्यात त्यांच्या उठण्याची वेळ, झोपण्याची वेळ, व्यायामावर खर्च होणारा वेळ आणि मानसिक कामाची वेळ (ऑफिसचे काम, वाचन इ.) यांची नोंद करायची होती. 

सहभागींच्या रोजच्या जेवणाच्या वेळेनुसार त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्यात. रोजच्या खाद्यापदार्थावरुन त्यांचा कॅलोरीक घेण्याचे प्रमाण स्वयं-अहवालाने सादर केले. यावरुन प्रत्येक सहभागीचे वजन आणि बॉडी मास इंडेक्स मोजण्यात आले. तसेच झोपचा काळ आणि प्रकार (किंवा गुणवत्ता) स्वयं-अहवाल व प्रश्नावलीच्या माध्यमातून नोंदवण्यात आले. 

स्वयं-अहवालावरुन सर्वांचा साधारण झोपेचा काळ प्रत्येक रात्री 5.5 तास होता. यावरुन सहभागी 1,103 किलो कॅलरी ग्रहण करतो. तर 28.4 किलोग्रॅम बॉडी मास इंडेक्स वाढलेला आढळून आला. सहभागींपैकी 97 सहभागी रात्री उशीरा पर्यंत जागणारे तर 113 सहभागी सकाळी लवकर उठणारे होते. सकाळी लवकर उठणाऱ्यांनी सकाळी 7:30 ते 9 च्या दरम्यान नाश्ता केला व रात्री उशीरा पर्यंत जागणाऱ्यांनी सकाळी 7 ते 8:30 दरम्यान नाश्ता केला. सकाळी लवकर उठणाऱ्यांची नाश्ता, दुपारचे जेवण, डिनर याच्या वेळा लवकर होत्या. पण रात्री उशीरा पर्यंत जागणाऱ्यांचा बॉडी मास इंडेक्स वाढलेला असतो असे या प्रयोगावरुन संशोधकांना आढळून आले. तर सकाळी लवकर नाश्ता, जेवण करणाऱ्यांमध्ये बॉडी मास इंडेक्सचे प्रमाण 0.37 किलोग्रॅम म्हणजे कमी आढळून आले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Early breakfast is important for people with Type two diabetes