आता घरबसल्या फक्त दोन मिनिटांत भरा आपलं वीज बिल

Pay Online Electricity Bill Payment
Pay Online Electricity Bill Paymentesakal
Updated on
Summary

आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण छोट्या-छोट्या गोष्टी विसरत चाललो आहोत.

Electricity Bill Payment: वीज बिल दरमहिन्याला भरावं लागतं, जेणेकरून तुम्ही कोणत्याही कपातीशिवाय वीज वापरू शकता. वीज बिल भरण्यासाठी आपण वीज विभागाच्या कार्यालयात जातो, त्यामुळं वेळही वाया जातो आणि कधी-कधी लांबलचक रांगेत उभं राहावं लागतं. आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या छोट्या-छोट्या गोष्टी विसरतो आणि यापैकी काही या गोष्टी वेळेवर केल्या नाहीत, तर समस्या येतात. घाई गडबडीत अनेकदा आपण वीज बिल, पाणी बिल, घर कर आणि फोन बिल भरायला विसरतो. ही बिले वेळेवर न भरल्यास अडचण होऊ शकते. तर, इथं आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीनं सांगत आहोत, वीज बिल ऑनलाइन कसं भरायचं?

वीज बिल भरणा ऑनलाइन (Pay Electricity Bill Online) करण्यासाठी सर्व वीज वितरण कंपन्यांनी (Power Distribution Companies) त्यांची अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिलीय. यासोबतच प्रमुख वॉलेट अ‍ॅपवर बिल पेमेंट करण्याची सुविधाही देण्यात आलीय, जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही त्रासाशिवाय घरबसल्या वीज बिल भरता येईल. परंतु, बहुतांश लोकांना याबाबत माहिती नसल्याने त्याचा लाभ घेता येत नाही. आता ऑनलाइनचं युग आहे आणि आता जवळ-जवळ सर्व कामे आपल्या मोबाईलवर होतात. आता बिल भरण्यासाठी वीज कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत नाहीत. तुम्हालाही तुमचं वीज बिल भरायचं असेल, तर तुम्ही ते घरी बसून सहज करू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही PhonePe अ‍ॅपच्या मदतीनं तुमचं वीज बिल कसं जमा करू शकता?

Pay Online Electricity Bill Payment
तुमचा स्मार्टफोन खूप गरम होतोय? करा हे सोपे उपाय
Pay Online Electricity bill
Pay Online Electricity bill

वीज बिल भरणा ऑनलाइन करण्यासाठी सर्व वीज वितरण कंपन्यांनी त्यांचं अधिकृत वेब पोर्टल उपलब्ध करून दिलंय, पण बिल जमा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, पेमेंट अ‍ॅप याद्वारे तुम्ही तुमचं वीज बिल फक्त दोन मिनिटांत जमा करू शकता. तर, पेमेंट अ‍ॅपद्वारे बिल कसं भरायचं याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Pay Online Electricity Bill Payment
घरबसल्या करा आधार-मतदार कार्ड लिंक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Pay Light Bill online
Pay Light Bill online

PhonePe अ‍ॅपच्या मदतीनं वीज बिल अशा प्रकारे भरा (Pay Electricity Bill using PhonePe)

स्टेप 1 : सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये PhonePe App इन्स्टॉल करावं लागेल. ते Play Store मध्ये उपलब्ध आहे.

स्टेप 2 : PhonePe पेमेंट अॅप वापरण्यासाठी तुम्हाला मोबाइल नंबरनं लॉग इन करणं आवश्यक आहे. यासाठी दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर लॉगिन पर्याय निवडा.

स्टेप 3 : जर तुमच्याकडं आधीच PhonePe खातं असेल, तर तुम्ही पासवर्डनं लॉग इन करू शकता. जर तुमचं खातं तयार झालं नसेल, तर Login With OTP पर्याय निवडा.

स्टेप 4 : PhonePe पेमेंट अॅपमध्ये लॉग इन केल्यानंतर, तिथं उपलब्ध असलेल्या सर्व वैशिष्ट्यांसाठी एक पर्याय दिसेल. आता तिथं तुम्हाला तुमचं वीज बिल जमा करावं लागेल. यासाठी रिचार्ज आणि पे बिल पर्यायावर क्लिक करा आणि इलेक्ट्रिसिटी आयकॉनची निवडा.

स्टेप 5 : आता स्क्रीनवर सर्व राज्यांच्या वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांची यादी दिसेल. यात तुम्हाला तुमचं राज्य आणि तुम्ही ज्या कंपनीचे ग्राहक आहात, तो पर्याय निवडा.

स्टेप 6 : आता तुम्ही वीज बिल भरुन अर्ज सबमिट करा. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं हे ओळखलं जातं. जसं की, BP number, account number, K number, CA number, Service Number, IVRS Number इत्यादी क्रमांक तुम्हाला जुन्या वीजबिलात सापडतील.

स्टेप 7 : आता मीटर क्रमांक टाकून पुष्टी करताच, बिलाची रक्कम स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही हे पैसे त्या महिन्याच्या वीज बिलाशी जुळवून पाहू शकता. जर रक्कम बरोबर असेल तर UPI, डेबिट/ATM कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले जाऊ शकते. यासाठी कार्ड तपशील भरा आणि पे बिल पर्याय निवडा.

Pay Light Bill online
Pay Light Bill online

पेमेंटची पुष्टी होताच, तुम्हाला व्यवहार क्रमांक आणि पावती मिळेल. तुमच्या फोनवर सेव्ह करा. कारण, ही पावती गरज पडेल तेव्हा कामी येईल. अशाप्रकारे, तुम्ही फोनपे पेमेंट अॅपद्वारे तुमचे वीज बिल अगदी सहजपणे भरू शकता. PhonePe पेमेंट अॅप व्यतिरिक्त, जर तुम्ही पेटीएम अॅप वापरत असाल किंवा Google Pay वापरत असाल, तर तुम्ही याद्वारे तुमचं बिल देखील सहज भरू शकता. यासोबतच, तुम्ही तुमच्या वीज वितरण कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचं वीज बिल जमा करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com