Elon Musk
Elon Musk esakal

Elon Musk Memo : मस्कचा ई-मेल म्हणजे खासगी क्षेत्रातील भयाण सांगणारे वास्तव

इलॉन मस्कने ट्वीटरची धूरा संभाळल्यानंतर ट्वीटरचे लाखो कर्मचारी अनिश्चितता आणि भीतीच्या छायेत जगत आहेत.

Elon Musk Memo To Twitter Employees : इलॉन मस्कने ट्वीटरची धूरा संभाळल्यानंतर ट्वीटरचे लाखो कर्मचारी अनिश्चितता आणि भीतीच्या छायेत जगत आहेत. या सर्व घडामोडींमध्ये मस्कने कर्मचाऱ्यांना एक ईमेल करत मेमो पाठवला आहे. तसेच प्रत्येकाला हा मेल चेक करण्यास सांगण्यात आले आहे.

मस्कने कर्मचाऱ्यांना पाठवललेल्या मेमोमध्ये सहा पॅरेग्राफ आहेत. यातील भाषेवरून मस्कला कर्मचाऱ्यांवर अजिबात विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. आज आम्ही तुम्हाला मस्कने पाठवलेल्या मेमोतील काही गोष्टी प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांसाठी किती महत्त्वाच्या आहेत याबाबत माहिती सांगणार आहोत.

मस्कने पाठवलेल्या मेमोची सुरूवात टीमला उद्देशुन करण्यात आली आहे. यामध्ये आजपासून ग्लोबल कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जाणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे. याबाबत ४ नोव्हेंबरला कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे सुचित केले जाईल असेही सांगण्यात आले आहे.

४ नोव्हेंबरला पाठवण्यात येणाऱ्या ईमेल्या सब्जेक्टमध्ये 'Your Role at Twitter' असे लिहिलेले असेल, अशा स्वरूपाचा ईमेल न मिळाल्यास कर्मचाऱ्यांनी एचआरला संपर्क करण्यास सांगण्यात आले आहे. ईमेलच्या दुसऱ्या पॅरामध्ये कर्मचाऱ्यांसाठी एक फर्मान देण्यात आले आहे. ज्यामध्ये यंत्रणा आणि ग्राहकांच्या डेटाच्या 'सेफ्टी'च्या नावाखाली सर्व कार्यालये बंद केल्याची माहिती आहे. ट्वीटर कर्मचाऱ्यांना प्रेस किंवा इतरत्र गोपनीय माहिती न देण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यानंतर शेवटी कर्मचाऱ्यांच्या सेवेबद्दल धन्यवाद देऊन मेमो संपवण्यात आला आहे.

Twitter Layoffs : 5 गोष्टी ज्या प्रायव्हेट जॉब करणाऱ्यांनी विसरू नये

  • नोकरीचा काही भरोसा नाही. ट्विटरचा मालक बदलला असून, येथे साधा सुपरवायजर जरी बदललला तरी नोकरी जाण्याची भिती असते. कर्मचाऱ्यांची संख्या कमी करताना कंपन्या मोठं मोठी विधानं करतील पण, स्पष्टपणे काहीच सांगणार नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ट्विटर. हेल्दी पाथच्या नावाखाली हे सर्व सुरू आहे. कर्मचाऱ्यांना कमी केल्याशिवाय ते यशस्वी होऊ शकणार नाही असे मस्कचे म्हणणे आहे. याचाच अर्थ असा की, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांनी नोकरी कधी जाईल यासाठी कायम तयार असले पाहिजे.

  • मस्कचा मेमोतील दुसरा पॅरा कॉर्पोरेटचे क्रूर वास्तव समोर आणणारा आहे. कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारेच कळवले जाईल. म्हणजेच कोणत्याही कर्मचाऱ्याशी फेस-टू-फेस संवाद साधला जाणार नाही. यावरून निर्दयी कॉर्पोरेट जग पुढे आहे आणि मानवता दुय्यम स्थानी असल्याचे दिसून येते.

  • तिसरा मुद्दा तुम्हाला नोकरीवरून काढण्यात आले आहे की, हे कसे जाणून घ्यायचे याबद्दल सूचना करणारा आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला मेल न आल्यास एचआरशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, चुकून कंपनीने मेल पाठवला नसला तरी, तुम्ही स्वतःहून समोर येत स्वतःचे भविष्य काय आहे याची विचारणा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर कंपनी सांगणार तुमची नोकरी टिकणार की जाणार.

  • चौथ्या मुद्द्यावरून असे लक्षात येते की, कंपनीचा त्यांच्या कर्मचाऱ्यांवर अजिबात विश्वास नाहीये. सर्व कार्यालये बंद आहेत, तसेच बॅज एक्सेस सस्पेंड करण्यात आले आहे. असे करण्यामागे छाटणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणीही ऑफिसमध्ये येऊ नये हाच आहे. अशी कॉर्पोरेट शैली आत्तापर्यंत फक्त चित्रपटांमध्येच पाहण्यात आली होती.

  • पाचवा आणि शेवटा मुद्दा प्रत्येक ट्वीटर कर्मचाऱ्यांसाठी विध्वंसक असा आहे. जर तुमची नोकरी गेली असेल तर, कर्मचाऱ्यांनी कंपनीबद्दल चुकीचे भाष्य करू असे ट्वीटरला वाटते. साधारणपणे खाजगी कंपन्यांच्या करारामध्ये कंपनीबाबत अंतर्गत चर्चा करण्यास मनाई असते.

याच बाबीची विचार करत ट्विटरने पाठवलेल्या ममोमध्ये कर्मचाऱ्यांना एखाद्याची नोकरी गेल्यास कंपनीच्या गोपनीय माहितीबद्दल सोशल मीडिया, प्रेस किंवा इतर कुठेही चर्चा न करण्यास सांगण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचे भविष्य आधांतरी असताना मेमोच्या शेवटी कर्मचार्‍यांच्या संयमासाठी आम्ही आभारी असल्याचे कंपनी म्हणत कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com