Twitter Feature : सर्वांना मोफत मिळणार ट्विटरचे 'हे' खास फीचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter

Twitter Feature : सर्वांना मोफत मिळणार ट्विटरचे 'हे' खास फीचर

इलॉन मस्क यांना ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनशिवाय सर्व ट्विटर वापरकर्त्यांसाठी एडीट बटण विनामूल्य उपलब्ध करून द्यायचे आहे. ट्विटरचा ताबा घेतलेल्या इलॉन मस्क यांनी ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सेवेसाठी दरमहा $8 (सुमारे 660 रुपये) आकारून ट्विटरच्या पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करण्याची योजना जाहीर केली. सध्या एडीट फिचर यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील ट्विटर (Twitter) ब्लू ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ट्विट एडीट फिचर वापरकर्त्यांना ट्विट प्रकाशित झाल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत बदल करण्यास अनुमती देते.

एलोन मस्क प्लॅटफॉर्मवरील सर्व वापरकर्त्यांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता एडीट बटण उपलब्ध करून देणार आहेत. सध्या यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या निवडक देशांमध्ये चाचणीसाठी एडीट बटन उपलब्ध आहे.

हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

30 मिनिटांत 5 वेळा ट्विट एडीट करण्याची सुविधा

ट्विटरचे (Twitter) बहुप्रतिक्षित ट्विट एडीट फिचर गेल्या महिन्यापासून ब्लू टिक वापर कर्त्यांसाठी आणले आहे. हे टूल वापरकर्त्यांना ट्विट पोस्ट केल्याच्या 30 मिनिटांत पाच वेळा एडीट करण्याची परवानगी देते. वापरकर्ते मूळ ट्विट एडीटचा इतिहास आणि त्यानंतरच्या बदलांसह देखील पाहू शकतात.

हेही वाचा: Pakistan : पाकिस्तानच्या 'या' नेत्यांचा जीव घेण्याचा झाला होता प्रयत्न

एलोन मस्कने गेल्या आठवड्यात ट्विटर $ 44 अब्ज (सुमारे 3,63,700 कोटी रुपये) मध्ये विकत घेतले. एलोन मस्कने ट्विटर अधिग्रहण केल्यापासून  मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, कायदेशीर कार्यकारी विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल आणि जनरल काउंसिल सीन एजेट यांना काढून टाकले आहे. त्याने अलीकडेच सोशल मीडियाला जाहिरातींवर कमी अवलंबून राहण्याच्या योजनाही उघड केल्या आहेत.