Twitter: आधी कर्मचाऱ्यांना काढले बाहेर, आता ट्विटर यूजर्सला चक्क 'जेल'मध्ये पाठवणार मस्क

एलॉन मस्क मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये अनेक बदल करण्याच्या तयारीत आहे. मस्क आता ट्विटरवर व्हर्च्यूअल जेल फीचर आणण्याची शक्यता आहे.
Elon musk twitter
Elon musk twitterSakal

Twitter New Features: माइक्रो-ब्लॉगिंग साइट Twitter ची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून प्लॅटफॉर्मवर अनेक बदल पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसात ट्विटरवर अनेक बदल पाहायला मिळू शकतात. लवकरच प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर येण्याची शक्यता आहे. कंपनीच्या पॉलिसीचे उल्लंघन केल्यास यूजरला व्हर्च्यूअल जेलमध्ये लॉक केले जाऊ शकते.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

ट्विटर यूजरने सुचवली कल्पना

एका ट्विटर यूजरने 'व्हर्च्यूअल जेल'ची कल्पना सुचवली आहे. याद्वारे यूजर्सला प्लॅटफॉर्मवर कोणतीही अ‍ॅक्टिव्हिटी करता येणार नाही. एका ट्विटर यूजरने मायक्रो-ब्लॉगिंग साइटमध्ये सुधारणा करण्यासाठी 'ट्विटर जेल'ची कल्पना सुचवली आहे. तसेच, यूजरला ट्विटर जेलमध्ये पाठवण्याआधी त्याबाबतची कारणे देखील द्यावी, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे यूजरच्या या कल्पनेवर मस्क यांनी देखील सहमती दर्शवली आहे.

Elon musk twitter
Tesla Cybertruck: या गाडीला खरेदी करण्यासाठी लोकांची लागली रांग, लाँचआधीच तब्बल १६ लाख बुकिंग

ट्विटर यूजर्सने माइक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करण्यासाठी इतरही सूचना दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, ट्विट अ‍ॅक्टिव्हिटीसोबतच रीच स्टॅटिक्स फीचर देखील जोडण्यात यावे. मस्क यांनी ही देखील चांगली कल्पना असल्याचे म्हटले आहे.

ट्विटरवर होत आहेत अनेक बदल

मस्क ट्विटरवर अनेक बदल करत आहे. कंपनी ट्विटर मेसेजला एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बनवणार आहे. ज्यामुळे यूजर्सचे मेसेज लीक होणार नाहीत. तसेच, कंपनी लाँग फॉर्म टेक्स्टला थ्रेडमध्ये बदलण्यावर देखील काम करत आहे. सध्या ट्विटसाठी २८० अक्षरांची मर्यादा आहे. कंपनी पेड सबस्क्रिप्शनवर देखील काम करत आहे. यूजर्स पैसे देऊन स्वतःला व्हेरिफाइड देखील करू शकतात. कंपनी लवकरच ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन सेवा पुन्हा सुरू करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com