SpaceX Starlink : इलॉन मस्कने पृथ्वीच्या कक्षेत सोडले 23 नवे सॅटेलाईट; 'स्टारलिंक'ची व्याप्ती वाढणार!

स्पेस एक्स कंपनीचं स्टारलिंक हे जगातील सर्वात मोठं उपग्रहांचं जाळं आहे.
SpaceX Starlink
SpaceX StarlinkeSakal

इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्सने आपल्या स्टारलिंक सॅटेलाईट श्रृंखलेत आणखी 23 उपग्रहांची भर घातली आहे. फ्लोरिडामधील लाँचपॅडवरुन याचं प्रक्षेपण करण्यात आलं. यासाठी फाल्कन 9 रॉकेटचा वापर करण्यात आला.

स्पेस एक्स कंपनीचं स्टारलिंक हे जगातील सर्वात मोठं उपग्रहांचं जाळं आहे. जगभरात सॅटेलाईट इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी हे ओळखलं जातं. भारतात अद्याप ही सेवा सुरू झाली नसली, तरी देशात सॅटेलाईट इंटरनेट हक्क मिळवण्यासाठी इलॉन मस्क मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे.

SpaceX Starlink
Ganganyaan मिशनच्या चाचणीबाबत ISRO च्या प्रमुखांनी दिली खुशखबर

पृथ्वीच्या कक्षेत 23 नवे उपग्रह लाँच करतानाचे फोटो स्पेस एक्सने आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन शेअर केले आहेत. यासोबतच अंतराळात आपल्या अपेक्षित ठिकाणी उपग्रह पोहोचल्यानंतरचा व्हिडिओ देखील कंपनीने शेअर केला आहे. (Elon Musk)

स्टारलिंकने 2018 पासून आतापर्यंत पृथ्वीच्या कक्षेत तब्बल 5,300 उपग्रह पाठवले आहेत. यातील 4,900 उपग्रह सध्या कार्यरत आहेत. यात आता आणखी 23 उपग्रहांची भर पडली आहे. सामान्य लोकांना विना अडथळा हायस्पीड इंटरनेट मिळावं, आणि उपग्रहांच्या माध्यमातून एक इंटरकनेक्टेड नेटवर्क तयार व्हावं; हा स्पेसएक्सचा उद्देश्य आहे. (Tech News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com