Optimus Gen 2 : इलॉन मस्कने सादर केला नवीन रोबोट; डान्स, कवायत अन् किचनमध्येही करू शकतो काम! पाहा व्हिडिओ

Tesla Optimus Robot : इलॉन मस्कच्या मालकीची टेस्ला कंपनी ही गेल्या कित्येक वर्षांपासून ऑप्टिमस रोबोटवर काम करत आहे.
Optimus Gen 2
Optimus Gen 2eSakal

Elon Musk Shares Tesla Optimus Gen 2 Video : तुम्ही चित्रपटांमध्ये कित्येक वेळा रोबोटला मानवाप्रमाणेच हालचाली करताना पाहिलं असेल. रजनीकांतच्या रोबोट चित्रपटातील चिठ्ठीबाबू हा रोबोट तर किचनमध्ये स्वयंपाकही करताना दाखवला आहे. खऱ्या आयुष्यातील रोबोट अद्याप असं करू शकत नाही. मात्र, टेस्लाने तयार केलेला नवीन रोबोट लवकरच अशी कामं करू शकणार आहे.

इलॉन मस्कच्या मालकीची टेस्ला कंपनी ही गेल्या कित्येक वर्षांपासून ऑप्टिमस रोबोटवर काम करत आहे. एआयच्या मदतीने या रोबोटला अधिकाधिक सक्षम बनवलं जात आहे. आता या ऑप्टिमस रोबोटचं नवीन Gen2 व्हर्जन कंपनीने सादर केलं आहे. या रोबोटचा व्हिडिओ इलॉन मसक्ने आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसतंय, की ऑप्टिमस रोबोट हा अगदी एखाद्या मानवाप्रमाणेच हालचाली करत आहे. यासोबतच रोबोटबाबत इतर माहितीदेखील व्हिडिओमध्ये दिली आहे. मागील व्हर्जनच्या तुलनेत या रोबोटचं वजन 10 किलो कमी करण्यात आलं आहे. तसंच याच्या हालचाली देखील 30 टक्के जलद झाल्या आहेत.

इलॉन मस्कने शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत 37.5 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. लाखो लोकांनी याला लाईक आणि रिपोस्ट केलं आहे. काही महिन्यांपूर्वी इलॉन मस्कने ऑप्टिमसच्या जेन-1 रोबोटचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये हा रोबोट योग करताना दिसला होता. आता नवीन व्हर्जन यासोबतच अधिक कामं करू शकत आहे.

Optimus Gen 2
Tesla Optimus Robot : 'हा' रोबोट करतो मानवासारखी हालचाल, अनोख्या अंदाजात म्हणतो 'नमस्ते'! इलॉन मस्कने शेअर केला व्हिडिओ

काय काय करू शकतो?

ऑप्टिमस जेन 2 हा रोबोट डान्स करु शकतो, स्क्वॉट्स मारु शकतो. एवढंच नव्हे, तर अगदी अंडी उकडण्याचं कामही हा रोबोट करू शकतो. अंड्यासारख्या नाजूक गोष्टींना हाताळण्यासाठी या रोबोटच्या हातांमध्ये सेन्सर लावण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com