Neuralink : आता अंध व्यक्तींना दृष्टी देणार इलॉन मस्क? काय आहे न्यूरालिंकचा नवा प्रोजेक्ट? जाणून घ्या सविस्तर

Elon Musk Neuralink : न्यूरालिंकच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा इलॉन मस्कने केली आहे. आता मस्क अंध व्यक्तींना दृष्टी देण्याच्या दृष्टीने काम करणार आहे.
Neuralink Blindsight
Neuralink BlindsighteSakal

Elon Musk on Blindsight : काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्कच्या 'न्यूरालिंक' प्रोजेक्टमध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आली होती. मेंदूमध्ये चिप बसवलेल्या एका रुग्णाने चक्क केवळ विचारांच्या मदतीने कम्प्युटरवर बुद्धीबळ खेळून दाखवलं होतं. यानंतर आता न्यूरालिंकच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा मस्कने केली आहे. आता मस्क अंध व्यक्तींना दृष्टी देण्याच्या दृष्टीने काम करणार आहे.

न्यूरालिंक कंपनीच्या अंतर्गत मस्क हा नवा प्रोजेक्ट सुरू करत आहे. या माध्यमातून आम्ही जन्मापासून अंध असलेल्या व्यक्तींना देखील दृष्टी प्रदान करू शकतो, असा दावा इलॉन मस्कने केला आहे. हे तंत्रज्ञान नेमकं कशा प्रकारे काम करेल याबाबत जाणून घेऊया. (Elon Musk hints Blindsight Next)

कसं काम करेल तंत्रज्ञान?

ब्लाइंडसाईट हे कॅमेरा किंवा त्यासारख्या एखाद्या उपकरणांचा वापर करून दृश्य डेटा कॅप्चर करेल. या डेटावर संगणकाद्वारे प्रक्रिया केली जाईल, आणि मेंदूला समजेल अशा स्वरुपात - म्हणजेच इलेक्ट्रिकल इम्पल्समध्ये त्याचं रुपांतर केलं जाईल. यानंतर हे इम्पल्स मेंदूमध्ये बसवण्यात आलेल्या न्यूरालिंक चिपकडे पाठवले जातील. यांच्या मदतीने हे डिव्हाईस व्हिजुअल कोर्टेक्समध्ये स्टिम्युलेशन पॅटर्न तयार करतील.

Neuralink Blindsight
Elon Musk on Drugs : 'एवढी मोठी कंपनी चालवण्यासाठी गरज असतेच', ड्रग्ज घेण्याबद्दल इलॉन मस्कने दिलं स्पष्टीकरण

जन्मापासून अंध असणाऱ्या, अपघातामुळे दृष्टी गमावलेल्या अशा सर्वच व्यक्तींसाठी हा एक उत्तम पर्यायी मार्ग ठरू शकतो. डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी साधारणपणे ऑप्टिक नर्व्हचा वापर होतो. न्यूरालिंकचं डिव्हाईस हे या नर्व्ह्जना पर्याय म्हणून काम करेल. यामुळे ऑप्टिक नर्व्हज डॅमेज झाल्या असतील, तरीही एखादी व्यक्ती पाहू शकणार आहे. यामध्ये मेंदूला स्टिम्युलेट करणं हेच सर्वात मोठं आव्हान असणार आहे.

न्यूरालिंकची यशस्वी वाटचाल

काही महिन्यांपूर्वी जेव्हा न्यूरालिंकला मानवी चाचणीची परवानगी मिळाली होती, तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष या कंपनीकडे लागून होतं. कोणत्याही कारणामुळे संपूर्ण शरीर अधू पडलेल्या व्यक्तींना केवळ विचार करून कम्प्युटर चालवता येईल, असं भाकित मस्कने तेव्हा केलं होतं. यानंतर आता असा एक रुग्ण चक्क 'चेस' खेळताना दिसला आहे. यामुळे न्यूरालिंक हे मोठ्या वेगाने प्रगती करत असल्याचं स्पष्ट होत आहे.

Neuralink Blindsight
Elon Musk on Grok : ओपन एआय सारखी नफेखोर नसणार आमची कंपनी; 'ग्रॉक' असणार पूर्णपणे ओपन सोर्स! इलॉन मस्कची मोठी घोषणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com