twitter
twitter Sakal

Twitter: एलॉन मस्कचा दरारा! 'या' पुणेकर मित्राचे बंद झालेले अकाउंट पुन्हा केले सुरू? जाणून घ्या प्रकरण

एलॉन मस्कचा पुणेकर मित्र प्रणय पाटोळेचे ट्विटर अकाउंट बंद झाल्यानंतर अवघ्या ४८ तासात पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

Elon Musk: अब्जाधीश एलॉन मस्क यांचे पुणेकर मित्र प्रणय पाटोळेचे अकाउंट ट्विटरने बंद केल्याचे समोर आले होते. पॉलिसीचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. परंतु, ४८ तासांच्या आतच कंपनीने प्रणयचे अकाउंट पुन्हा सुरू केले आहे. यानंतर प्रणयचे अकाउंट पुन्हा सुरू करण्यात एलॉन मस्क यांचा तर हात नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

२४ वर्षीय प्रणय पाटोळे आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क हे दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. दोघांचा ट्विटरच्या माध्यमातून संवाद देखील होतो. प्रणयने ऑगस्ट २०२२ मध्ये टेस्लाच्या फॅक्ट्रीला भेट मस्क यांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील या दोघांच्या मैत्रीची विशेष चर्चा झाली होती. पुणेकर असलेला प्रणय हा आयटी क्षेत्रात काम करतो.

twitter
iPhone factory: Apple चीनला देणार मोठा झटका, आयफोन फॅक्ट्री होणार बंद; भारताचा फायदा?

प्रणय नियमितपणे मस्क व टेस्लाबाबत ट्विट करत असतो. परंतु, दोन दिवसांपूर्वी पॉलिसीचे उल्लंघन केल्याने त्याचे अकाउंट बंद करण्यात आले होते. याबाबत एका ट्विटर यूजरने ट्विट केल्यानंतर मस्क यांनी रिप्लाय देत याबाबत त्वरित माहिती घेत असल्याचे म्हटले होते. मस्क यांच्या ट्विटनंतर काही तासातच प्रणयचे अकाउंट पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, अनेक यूजर्सने प्रणयचे ट्विट्स हे Reddit वरील माहिती कॉपी करून टाकलेले असल्याची तक्रार केली होती. यूजर्सने रिपोर्ट केल्यानंतर प्रणयचे अकाउंट बंद करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, ४८ तासांच्या आत अकाउंट पुन्हा कसे सुरू झाले, हे स्पष्ट झाले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com