Elon Vs. Mark UFC : 'मस्क-झुकरबर्ग रिंगणात भिडणार, तारीखही ठरली'; यूएफसीचे अध्यक्ष डॅना व्हाईट यांची माहिती

सध्या या फाईटचं जोरदार मार्केटिंग सुरू आहे.
Elon Vs. Mark UFC
Elon Vs. Mark UFCeSakal
Updated on

ट्विटरचे मालक इलॉन मस्क आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग लवकरच रिंगणात एकमेकांना भिडणार आहेत. काही दिवसांपूर्वी मजेत मस्क यांनी आपल्याला मार्कशी बॉक्सिंग करायला आवडेल असं म्हटलं होतं. त्यानंतर मार्क झुकेरबर्गने याला प्रत्युत्तर देत 'कुठे भेटायचं सांग' अशा आशयाची स्टोरी शेअर केली होती.

यानंतर हे दोघेही या फाईटबद्दल सीरियस असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं होतं. या दोघांनीही यासाठी प्रोफेशनल बॉक्सरकडून ट्रेनिंग सुरू केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. मात्र, तरीही या फाईटबद्दल फॅन्सच्या मनात साशंकता होती. आता अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिपचे अध्यक्ष डॅना व्हाईट यांनी ही फाईट नक्कीच होणार असल्याचं म्हटलं आहे.

Elon Vs. Mark UFC
Threads Vs Twitter : 'स्पर्धा ठीक आहे, पण चीटिंग नाही..'; थ्रेड्स अ‍ॅपवरून मेटाला कोर्टात खेचणार इलॉन मस्क

१०० टक्के फाईट होणार

"या बॉक्सिंग फाईटबद्दल हे दोघेही १०० टक्के तयार आहेत. मी यासाठी एक तारीख ठरवली आहे. आमची तयारी पूर्ण झाल्यानंतर मी ही तारीख जाहीर करेल." अशी माहिती यूएफसीचे अध्यक्ष व्हाईट यांनी दिली. लास व्हेगासमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या यूएफसी-३०० या चॅम्पियनशिपमध्ये ही फाईट होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या चॅम्पियनशिपपूर्वी किंवा नंतर ही फाईट होऊ शकते.

कोट्यवधींचा रेव्हेन्यू

या फाईटसाठी आतापासूनच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अगदी यूएफसीच्या वेबसाईटवर या दोघांच्या फाईटचं प्रमोशन करणारे टी-शर्ट देखील विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. लास व्हेगास सरकार या फाईटला नक्कीच परवानगी देईल असा विश्वास व्हाईट यांनी व्यक्त केला. अगदी लास व्हेगास नसलं, तरी दुसरं राज्य किंवा देश नक्कीच परवानगी देईल. कारण यातून कोट्यवधी डॉलर्सचा रेव्हेन्यू जनरेट होणार आहे, असं व्हाईट म्हणाले.

Elon Vs. Mark UFC
Elon Musk mocked Zuckerberg: थ्रेडस् विरुद्ध ट्विटर, एलॉन मस्ककडून झुकरबर्गच्या नावाचा 'खेळखंडोबा'

ट्रेनिंग सुरू

दरम्यान, मार्क झुकरबर्गने या फाईटसाठी ब्राझिलियन जुजुत्सुचं ट्रेनिंग सुरू केलं आहे. डेव्ह कामारिल्लो या प्रशिक्षकाकडून मार्क ट्रेनिंग घेत आहे. तर दुसरीकडे इलॉन मस्कदेखील जॉर्जेस सेंट-पिएरे आणि जॉन डॅनाहर या दिग्गज यूएफसी चॅम्पियन्सकडून ट्रेनिंग घेत आहे.

थ्रेड्समुळे आगीत तेल

या सगळ्याच्या दरम्यान, इन्स्टाग्रामने थ्रेड्स हे अ‍ॅप लाँच करुन या आगीमध्ये आणखी तेल ओतलं आहे. ट्विटरला टक्कर देण्यासाठी हे अ‍ॅप लाँच करण्यात आलं आहे. मात्र, ही ट्विटरचीच कॉपी असल्याचं म्हणत मार्कने चीटिंग केल्याचा आरोप इलॉनने केला आहे. तसंच, काही दिवसांपूर्वी इलॉनने असभ्य भाषेत टीका करून मार्कवर कमरेच्या खाली वार केला होता.

Elon Vs. Mark UFC
Elon Musk Earnings: बाबो, मार्क झुकरबर्गच्या आयुष्यभराच्या कमाई एवढे तर इलॉन मस्कने 6 महिन्यात कमवले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com