X Disagrees Center's Orders : 'आम्ही तुमचं ऐकतोय.. मात्र हे बरोबर नाही'; मोदी सरकारच्या आदेशावर मस्कची कंपनी नाराज!

X on Blocking Posts : मोदी सरकारने भारतातील काही एक्स हँडल्स ब्लॉक किंवा सस्पेंड करण्याचे आदेश कंपनीला दिले होते. तसेच काही पोस्ट्स देखील काढून टाकण्यास सांगितलं होतं.
Elon Musk X on Free Speech
Elon Musk X on Free SpeecheSakal

Elon Musk's X Disagrees with Center's Censorship : इलॉन मस्कची सोशल मीडिया कंपनी 'एक्स'ने (ट्विटर) मोदी सरकारच्या आदेशावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने भारतातील काही एक्स हँडल्स ब्लॉक किंवा सस्पेंड करण्याचे आदेश कंपनीला दिले होते. यावर कंपनीने कारवाईस होकार दिला असला, तरी या आदेशांवर नाराजी व्यक्त केली आहे. हे आदेश 'फ्री-स्पीच'वर गदा आणत असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

एक्सच्या ग्लोबल गव्हर्नमेंट अफेअर्स टीमने एका पोस्टच्या माध्यमातून ही नाराजी व्यक्त केली आहे. "भारत सरकारने आम्हाला एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स दिल्या आहेत, ज्यामध्ये काही एक्स अकाउंट्स आणि पोस्टवर कारवाई करण्यास सांगितलं आहे. यातील काही अकाउंट्सवर दंडात्मक कारवाई आणि तुरुंगवासाची कारवाई देखील करण्याची भाषा करण्यात आली आहे." असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. (Elon Musk)

'आम्ही असहमत..'

या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय, "सरकारच्या आदेशांनुसार आम्ही या खात्यांवर कारवाई केलेली आहे. ही खाती आणि पोस्ट भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. अर्थात, या कारवाईला आमचं समर्थन नाहीये. या पोस्टना देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायला हवं असं आम्हाला वाटतं."

Elon Musk X on Free Speech
Neuralink : मेंदूमध्ये 'चिप' बसवलेल्या रुग्णाने केवळ इशाऱ्यांनी वापरला माऊस; इलॉन मस्कने दिली गुडन्यूज! सांगितला पुढचा प्लॅन

"आम्ही भारत सरकारच्या आदेशांना आव्हान देणारी रिट याचिका (X Writ petition) देखील दाखल केली आहे. यासोबतच ज्या यूजर्सची खाती किंवा पोस्टवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांना याबाबत नोटीस दिली आहे. कायदेशीर बंधनांमुळे आम्ही सरकारने दिलेल्या आदेशांची प्रत प्रसिद्ध करू शकत नाही. मात्र, पारदर्शकतेसाठी हे आदेश देखील सार्वजनिक करणे गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं." असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी

2022 साली दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाच्या (Farmer's Protest Delhi) वेळी मोदी सरकारने अशाच प्रकारचे आदेश ट्विटरला दिले होते. यावरुन ट्विटर आणि मोदी सरकारमधील तणाव देखील वाढला होता. ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनीदेखील मोदी सरकार आपल्यावर कारवाईसाठी दबाव आणत असल्याचे आरोप मागे केले होते. आता दिल्लीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन सुरू असताना 'एक्स'ने ही पोस्ट केली आहे.

Elon Musk X on Free Speech
Elon Musk Mars Mission : इलॉन मस्क 10 लाख लोकांना नेणार मंगळ ग्रहावर; सांगितला मार्स मिशनचा नवा गेम प्लॅन!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com